Home Breaking News भद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा भाजयुमोची जिल्हाधिऱ्यांकडे मागणी…

भद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा भाजयुमोची जिल्हाधिऱ्यांकडे मागणी…

28
0

Pratikar News

भद्रावती तालुका प्रतिनिधी
भद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
रिक्त पदांमुळे येथील तहसील कार्यालयामार्फत होत असलेली तालुक्यातील महत्वाची कामे रखडलेली आहे. सध्याच्या स्थितीत भद्रावती तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार-१, निवडणूक नायब तहसीलदार-१, संजय गांधी निराधार योजना नायब तहसिलदार-१, अव्वल कारकून-३, कनिष्ठ लिपिक-३, व शिपाई-४ असे तेरा पदे रीक्त असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामांचा तान येऊन नागरिकांची कामे रखडत आहे.पुढे शैक्षणिक सत्र सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, इतर दस्तऐवजांची गरज पडत असते. कर्मचारी कमी असल्यामुळे याचा त्रास नागरिक व विद्यार्थांच्या कामावर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वरील पदे त्वरित भरायची मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here