Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या कोर क्षेत्रात वाघाचे हल्यात एक ठार,,, मुधोली बिटातील घटना

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या कोर क्षेत्रात वाघाचे हल्यात एक ठार,,, मुधोली बिटातील घटना

403
0

ताडोबाच्या कोर क्षेत्रात वाघाचे हल्यात एक ठार,,,
मुधोली बिटातील घटना
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोर क्षेत्रातील मोहूर्ली वनपरिक्षेत्राचे मुधोली नियतक्षेत्राचे कक्ष क्रमांक 138 मध्ये बांबू तोडायला गेलेल्या 65 वर्षीय भारत रामाजी बावणे वाघाचे हल्यात जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 12 जून रोजी उघडकीस आली
मुधोली येथील भारत बावणे हा काल दुपारनंतर मुधोली नियतक्षेत्रात येणाऱ्या वाघाचे संचार क्षेत्र असलेल्या आंबागड परिसरात बांबू तोडायला गेला होता रात्र झाली तरी घरी परत आला नसल्याने संभडीत वनकर्मचार्याना याची माहिती देण्यात आली मृतकाचे कुटूंबीय आणि वन कर्मचाऱयांनी जंगल परिसरात शोध घेतला रात्री पाऊस आणि अंधार असल्याने शोध लागला नाही
त्यामुळे आज सकाळी परत शोध घेतला असता कोर क्षेत्रातील कक्ष क्रमांक 138 मध्ये त्याचा मृत्यूदेह आढळून आले घटनास्थळवरील पंचनामावरून वाघाचे हल्यात भारत बावणे चा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले याची माहिती वरिष्ठ वन अधिकारयांना देण्यात आली उपसंचालक जी गुरुप्रसाद यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक बी सी येडे यांचे नेतृत्वात वन परिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे,क्षेत्र सहायक आकाश मल्लेवार,राजेश महाताव,व्ही के जनबंधु पुढील कार्यवाही करीत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here