Home आपला जिल्हा मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण चंद्रपूर जिल्ह्यातील दारूची दुकाने जून...

मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण चंद्रपूर जिल्ह्यातील दारूची दुकाने जून महिन्यात चालु

107
0

Pratikar News

चंद्रपूर – मद्यप्रेमींचा 6 वर्षाचा वनवास मंत्र्यांच्या धडपडीने संपुष्टात आला, चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी तब्बल 6 वर्षांनी हटविण्यात आली.
या कालावधीत अनेकांनी आपली दारू दुकाने दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरित केली होती.
शासनाने त्यांच्या दारू दुकान परवाना स्थलांतराची प्रक्रिया तात्काळ सुरू करून पूर्णत्वास आणण्याचे निर्देश दिले आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दारू दुकाने या महिन्यातच सुरू होणार आहे.
दारू दुकान परवाने तात्काळ नुतनीकरणासाठी उत्पादन शुल्क कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
सोमवारपासून परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे.
सध्या जिल्ह्यातील दारू दुकान मालकांनी दुकाने साफसफाई करीत रंगरंगोटी सुरू केली आहे, आता लवकरच ही दुकाने सुरू होणार असल्याने मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित झाल्यावर दारू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला होता, महिला व अल्पवयीन मुलानी सुद्धा अवैध दारूविक्री सुरू केली, कोट्यवधी रुपयांची अवैध दारू, मुद्देमाल व हजारो आरोपी या व्यवसायात पोलिसांच्या ताब्यात होते.
शासनाने या दारुबंदीवर समीक्षा समिती बनवीत त्याचा अहवाल शासनाकडे सोपविला होता

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here