Home Breaking News तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली...

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते ?

51
0

Pratikar News

प्रतिकार न्युज नेटवर्क  
निलेश नगराळे

नवी दिल्ली:-कोरोना काळात देशात बँकिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लॉकडाउनमध्ये इंटरनेटचा वापर वाढणं हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे.ऑनलाईन खरेदी-विक्रीचं प्रमाण वाढल्याने सायबर क्राईम करणारे गुन्हेगार याचा फायदा घेत आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.

👉सरकारच्या ‘सायबर दोस्त’ नावाच्या ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विट करून नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. सायबर क्रिमिनल केवायसीच्या (KYC) नावाखाली लोकांना फसवत असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.त्यामुळे ग्राहकांनी केवायसी, रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप फ्रॉडपासून सावध राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वीही अनेकदा गृह मंत्रालयाने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.आजकाल फ्रॉड करणारे गुन्हेगार लोकांना केवायसीच्या नावावर कॉल किंवा SMS करून लोकांच्या पर्सनल डिटेल्स घेऊन त्यांच्या अकाउंटमधून पैसे चोरी करत आहेत. त्यामुळे कॉल किंवा मेसेज, मेलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असं आवाहन गृह मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.

👉👉केवायसीसाठी फोन आणि SMS आल्यास सावध रहा –

तुम्हाला केवायसीसाठी फोन किंवा SMS आला तर सावध राहा. केवायसी नसल्यामुळे तुमचं बँक अकाउंट बंद होईल, असा मेसेज आल्यास बँकेच्या ऑफिशियल नंबरवर संपर्क साधून याबाबत योग्य माहिती घ्या. याशिवाय अनोळखी नंबरवरून कोणताही फोन किंवा मेसेज आल्यास तुमचे पर्सनल डिटेल्स देऊ नका.याशिवाय Anydesk आणि TeamViewer सारखे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करू नका. अशा अ‍ॅप्सला तुम्ही तुमच्या फोनचा रिमोट अ‍ॅक्सेस दिला, तर सायबर क्रिमिनल तुमचे पिन, ओटीपी, बँक खात्याबद्दलची माहिती सहज मिळवू शकतात.त्याचा वापर करून ते तुमच्या बँक खात्यातील रक्कम काढू शकतात.

👉फेक मेसेजेस कसे टाळाल?

सरकारकडून वेळोवेळी फेक मेसेजेसच्याबाबतीत अलर्ट केलं जातं. कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोन किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. तसंच असे मेसेज फॉरवर्ड करणंही टाळा. तुमच्या सतर्कतेमुळे तुम्ही आणि तुमच्या संपर्कातील अनेक लोकांना अशा सायबर फ्रॉड्सपासून वाचवू शकता.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here