*म्युकरमायक्रोसिस फ़ंग्स औषध उपचार च्या अभावी रुग्ण बेहाल नियोजन तात्काळ कराने :- राजु झोडे*
*वंचित बहुजन आघाडीची मागणी*
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीनंतर म्युकरमायक्रोसिस या आजाराचे ८८ रुग्ण आढळले. या आजारावर चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही सरकारी वा खाजगी रुग्णालयांमध्ये अजूनही उपचारपद्धती रुग्णांना मिळत नसल्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे असा आरोप वंचितचे नेते राजू झोडे यांनी केला.
सरकारी रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांना थातूरमातूर उपचार दिल्या जात आहे. या आजारावरील इंजेक्शन व औषधोपचार अजूनही जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. ही बाब अतिशय गंभीर असून स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेणारे जिल्ह्यातील नेते राजकारण करून श्रेय घेण्याच्या व बढाया मारण्यात व्यस्थ आहेत. वर्तमानात या आजाराचे प्रमाण वाढून रुग्ण दगावण्याची दाट शक्यता आहे तरी खाजगी व सरकारी रुग्णालयाला यावरील आजाराचा औषध पुरवठा तात्काळ करावा तसेच खाजगी रुग्णालयात सुद्धा या आजारावर उपचार करण्याची परवानगी द्यावी करिता वंचित बहुजन आघाडी द्वारा माननीय आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
जर वरील मागणी तात्काळ पूर्ण करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडी द्वारा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे शासन व प्रशासनाला देण्यात आला. निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे ,मघू वानखेड़े सुभाष थोरात कृष्णा पेरका तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.