Home क्राइम खळबळजनक :- ऑपरेशन थेटरमधे तरुणीवर डॉक्टर व आरोग्य कर्मच्यार्याकडुन सामूहिक बलात्कार?

खळबळजनक :- ऑपरेशन थेटरमधे तरुणीवर डॉक्टर व आरोग्य कर्मच्यार्याकडुन सामूहिक बलात्कार?

74
0

Pratikar News

 

तरुणीला गंभीर अवस्थेत बोलता येत नसल्याने एका चिठ्ठीवर आपल्या भावाला माहिती दिल्याने गुन्हा उघड.

प्रतिकार न्यूज नेटवर्क:–

निलेश नगराळे

खरं तर माणूस जेव्हा मृत्यूशी झुंज देत असतो त्यावेळी त्याच्यासाठी डॉक्टरच देव असतो.कारण डॉक्टर अनेकांना जीवनदान देतात. मात्र प्रयागराजमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका तरुणीचं आयुष्य देव समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांनीच उद्ध्वस्त केलं आहे.

प्रयागराजमधील तरुणीवर रुग्णालयातील ऑपरेशन थेटरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडितेचं ऑपरेशन झालं सुद्धा होतं. मात्र ऑपरेशननंतर तिच्या नातेवाईकांना ती तरुणी त्रासलेली दिसून येत होती. तिला काही तरी सांगायचं होतं. मात्र तिला बोलणं कठीण झालं होतं. पीडितेच्या भावाने तरुणीकडे पेन आणि कागद दिला. त्यावर तिने लिहिलं की, येथील डॉक्टर चांगले नाहीत. उपचाराच्या नावावर या लोकांनी माझ्यावर अत्याचार केले. प्रयागराजमधील एसआरएन रुग्णालयातील डॉक्टरांवर मिर्झापूर येथील तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

पीडितेला आतड्यांच्या आजारामुळे २९ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १ जून रोजी पीडितेला सर्जरीसाठी ऑपरेशन थेअटरमध्ये नेण्यात आलं होतं. तिथेच तरुणीवर कथितरित्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं तरुणीने कागदावर लिहून दिल.या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी सत्येंद्र तिवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस तरुणीचा जबाब नोंदविण्यासाठी पुन्हा येणार होते. त्यापूर्वीच पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा डॉक्टरांनी केलेल्या अत्याचाराची माहिती लिहितांनाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.एसआरएन रुग्णालयाने डॉक्टरांविरुद्ध पीडितेने केलेल्या सामूहिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी डॉक्टरांची एक समिती स्थापन केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here