Home आपला जिल्हा ग्रामपंचायत चापलवाडा येथील ग्रामसेवक यांना निलंबित करा* *आमदार डॉ देवराव होळी...

ग्रामपंचायत चापलवाडा येथील ग्रामसेवक यांना निलंबित करा* *आमदार डॉ देवराव होळी यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मागणी निवेदन केले सादर*

53
0

*ग्रामपंचायत चापलवाडा येथील ग्रामसेवक यांना निलंबित करा*

*आमदार डॉ देवराव होळी यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मागणी निवेदन केले सादर*

चामोर्शी सुखसागर झाडे:- चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत चापलवाडा येथील ग्रामसेवक पि,एस,मसराम ग्रामपंचायत कार्यालय चापलवाडा येथे कार्यरत होते.दिनांक 31/3/2021 पासून वैद्यकिय रजेवर गेले त्यानंतर पि, ए , मुलकलवार ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत चापल वाडा येथील प्रभार सोपवण्यात आला त्यानंतर
दिनांक 1/6/2021 रोजी पासून ग्रामसेवक पि,एस मसराम ग्रामपंचायत चापल वाडा येथे येत आहेत व या रुजू होणे बाबत येथील सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून अर्वाच्य भाषेत तुम्ही कलेक्टर कडे जा सी ई ओ कडे जा आमदार कडे जा आणि मला कोणाची भीती नाही व कोणाच्या आदेशाची आवश्यकता नाही असे बोलून आय ए एस अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा अपमान केला सबंधित ग्रामसेवक मसराम यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय येथे काम करतांना नेहमी गैरहजर राहणे ,मासिक सभा विहित कालावधीत न घेणे , शासकीय योजनांची अंमलबजावणी न करणे याविषयी वारंवार तक्रार करूनही अजूनपर्यंत कोणतेही कारवाई करण्यात आली नाही व सदर ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत कार्यालय चापलवाडा येथून तत्काळ हकालपट्टी करून निलंबित करण्यात यावे.अशी मागणी आमदार डॉ देवराव होळी यांना दिलेल्या निवेदनात केली यावेळी रेखा ताई कोहपरे सरपंच ग्रा, प, चापल वाडा ,मनोज येलमुले उपसरपंच चापलवाडा चेक नारायण भट्टलवार ग्रा,सदस्य यशवंत बर्लावार ग्रा,सदस्य ज्योती रामटेके ग्रा,सदस्य , गितेश कोहपरे , गंगाधर रामटेके यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , साईनाथ भाऊ बुरांडे ,प्रतीक राठी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here