Home विशेष प्रेम:- अविवाहित जोडपे लॉज वर सापडले तर घाबरू नका,करा हे काम, ...

प्रेम:- अविवाहित जोडपे लॉज वर सापडले तर घाबरू नका,करा हे काम, पोलीस का गुन्हा दाखल करणार नाही वा नाही होणार शिक्षा, जाणून घ्या…

62
0

Pratikar News

प्रेमाचा कट्टा:-

भारतीय संस्कृती व परंपरा ही दोन अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्यास व शारीरिक सबंध ठेवण्यास मज्जाव करत असली तरी आता कायद्याने तो अधिकार झाला असून एखाद्या लॉजवर अविवाहित जोडपे गेले असताना अचानक पोलिस आले तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. अगदी अविवाहीत असले तरी. फक्त तुमचे वय 18 पेक्षा जास्त असावे लागणार आहे. कलम 21 नुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकता किंवा इच्छेनुसार शाररिक संबंध ठेवू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पोलिसांना हॉटेलवर किंवा लॉजवर राहिलेल्या जोडप्याला त्रास देण्याचा अथवा अटक करण्याचा कोणताही अधिकार नाही. अविवाहित (वय 18 पेक्षा जास्त) युवक-युवतींना हॉटेलमध्ये राहण्यासाठी अथवा सहमतीने शाररिक संबंध ठेवण्याचा मुलभूत अधिकार आहे. हॉटेल अथवा लॉजवर पकडल्यानंतर पोलिस त्रास देत असतील अथवा अटक करत असतील तर या कारवाईविरूद्ध, जोडपे घटनेच्या कलम 32 किंवा थेट कलम 226 च्या अंतर्गत थेट न्यायालयात जाऊ शकतात. त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱयाविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केली जाऊ शकते. याशिवाय पीडित जोडप्याला मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. हॉटेल अविवाहित जोडप्यांना दोघांचे लग्न झाले नाही, कारणास्तव थांबू देत नसेल तर ते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन समजले जाईल. अविवाहित जोडप्यांना हॉटेलचे भाडे देऊन आरामात राहण्याचा अधिकार आहे.

भारतीय हॉटेल इंडस्ट्रीची सर्वोच्च संस्था हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया येथेही अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये थांबण्यापासून रोखण्याचा कोणताही नियम नाही. पोलिस हॉटेल्सवर छापा का घालतात? अविवाहित जोडप्यांना अटक करण्यासाठी किंवा छळ करण्यासाठी पोलिस हॉटेलमध्ये छापा टाकत नाहीत. वेश्याव्यवसाय हा भारतात गुन्हा मानला जातो. अशा वेश्या व्यवसायाविरूद्ध किंवा गुन्हेगाराला लपवण्याच्या शक्यतेवरून पोलिस हॉटेलवर छापा टाकतात. छापा टाकल्यानंतर एखादे अविवाहीत जोडपे आढळले तर घाबरून जाण्याची गरज नाही.पोलिसांच्या मागणीनुसार अशा जोडप्याला त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागेल. यामुळे हे सिद्ध होईल की दोघेही परस्पर संमतीने हॉटेलमध्येच आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या वेश्याव्यवसायात सहभागी नाहीत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here