Home Breaking News फक्त फुलांचा गुच्छ द्या..आणि अवैध धंदा चालवा ? कान्हान पोलिस ठाण्याचे...

फक्त फुलांचा गुच्छ द्या..आणि अवैध धंदा चालवा ? कान्हान पोलिस ठाण्याचे पीआय चे स्वागत अवैध व्यवसाय करणाऱ्या कडून..!

18
0

 Pratikar News

फक्त फुलांचा गुच्छ द्या..आणि अवैध धंदा चालवा ?

कान्हान पोलिस ठाण्याचे पीआय चे स्वागत अवैध व्यवसाय करणाऱ्या कडून..!

सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
तक्रार डीजी कडे  जाणार?

निलेश नगराळे 

नागपुर

जेव्हा जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये नवीन पीआय येतो तेव्हा अवैध धंद्याची साखळी बिघडते, परंतु ती सुधारण्यासाठी बेकायदेशीर व्यवसाय करणारे पोलिस स्टेशनच्या पीआई ला फुलांचा गुच्छ देऊन नमस्कार करतो, बस येथूनच अवैध व्यवसायला बळ मिळतो. असाच एक फोटो व्हायरल झाला तो WH न्यूज़ च्या हाती लागला.विशेष म्हणजे नागपूर ग्रामीण कन्हान पोलिस स्टेशनचे पीआय अरुण त्रिपाठी कार्यरत आहेत. मंगळवारी पीआयचा त्यांच्याच पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला, ज्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. अवैध धंद्यासंदर्भात पुष्पगुच्छ देणाऱ्या छायाचित्रातून हे स्पष्ट होते की ते बेकायदेशीर अवैध व्यवसाय चालविन्या करिता आहे.

पीआय अरुण त्रिपाठी यांचा एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, पुष्पगुच्छात आणखी दूसरा चिरिमिरी चा गुच्छा असू शकते?
हे लक्षात घेण्यासारखे आहे की कन्हान भागात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
सत्कार चित्रात दिसनारे एक जण दारूची तस्करी करतो, तर दुसरा गांजा तस्करी करतो अशी माहिती आहे. आता या दोन बेकायदेशीर व्यवसायांशी जुडणाऱ्या संबंधित लोकांनी पीआयचे स्वागत करण्याचा काय अर्थ आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, आता हे छायाचित्र एका संस्थेच्या माध्यमातून पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे जात आहे.

पीआय त्रिपाठींवरही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या ची माहिती असल्यानंतरही त्यांनी आपल्याच पोलिस ठाण्यात अवैध व्यापार करणाऱ्या कडून फुलांचा गुच्छ का स्वीकारला?

दोन वर्षांपासून पोलिस कोरोना नियमांचे पालन करण्यास सतत पोलिसांना सांगत आहेत, पण पीआयने स्वतः मुखवटयावर मास्क लावले नाही. जरी मास्क घातला नाही तरी दोन गज दूरी आनंतर ठेवणे जरुरी समजले नाही.

जर सामाजिक, राजकीय आणि सामाजिक संघटनेने सत्कार केला असता तर आदर वाढला असता, परंतु त्याच गुंड, बदमाश, अवैध धंद्यातील लोकांनी सत्कार केल्याने पोलिस समाजाला काय संदेश देतील? याला समजने स्वतः पोलिस खात्याची गरज आहे.

पीआय त्रिपाठी यांचा सत्कार करणारे कायडू आणि कुट्टू असे दोन डॉन आहेत.एक दारूची तस्करी तर दुसरा गांजाची अवैधगिरी करतो.अशी माहिती सूत्राने दिली.असेही माहिती आहे की,सदर लोक गुन्हेगारीशी संबंधित आहेत.

या व्हायरल छाया चित्राची काटेकोरपणे चौकशी केल्यास पीआय त्रिपाठी यांना दोष देता येईल.आता या प्रकरणात पोलिस अधीक्षक राकेश ओला काय कारवाई करणार, हे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here