Home Breaking News चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखा अनियंत्रीत

चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखा अनियंत्रीत

18
0

प्रतिकार न्युज नेटवर्क

चंद्रपूर – कोरोना संचारबंदीचे नियम शिथिल झाल्यानंतर शहरातील वाहतुकीची समस्या पुन्हा एकदा वाढली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सध्या शाळा, महाविद्यालये बंद असून सुद्धा वाहतुकीची समस्या उदभवली आहे, शहरातील मुख्य मार्गावर चारचाकी वाहनांची झुंबड असते, मात्र त्या वाहनांवर कारवाई करण्या ऐवजी नेहमीच दुर्लक्ष केलं जाते, वाहतूक पोलीस फक्त दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात अग्रेसर आहे मात्र मार्गावर मध्ये आपले चारचाकी वाहन उभे ठेवल्यावर कारवाई काही होत नाही.
सध्या चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेचे संपूर्ण लक्ष महामार्गावरील वाहनांवर लागले आहे, ओवरलोड, पर राज्यातील जड वाहने यावर कारवाई करून आपलं “टार्गेट” वाहतूक पोलीस पूर्ण करीत आहे, आतातर चंद्रपुरातील वाहतूक पोलीस जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा कारवाई करायला जात आहे.
चंद्रपूर वाहतूक पोलिसांच्या या कृतीने महामार्ग पोलीस व आरटीओ यामध्ये कमालीची संभ्रमाची निर्माण झाली आहे, जड वाहने यावर कारवाई करण्यासाठी परिवहन अधिकारी आहेत, महामार्गावरील वाहनांवर कारवाई साठी महामार्ग पोलीस असताना चंद्रपूर वाहतूक शाखा कारवाई करण्यास पुढे पुढे करीत आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनअंतर्गत वाहतूक पोलिसांची नेमणूक केली असून सुद्धा चंद्रपुरातील वाहतूक पोलीस जिल्ह्यातील ग्रामीण भागात जातं नागरिकांवर कारवाई करीत आहे.
शहरातील अनियंत्रित वाहतूक समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत जिल्ह्यातील वाहतूक समस्येकडे जास्त रस घेणे कारवाई चे रूप आहे की दुसर काही जे सामान्य नागरिकांना कळायला लागलंय म्हणून वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक यादव यांनी स्थानिक समस्येकडे जास्त लक्ष दिल्यास शहरातील वाहतुकीची समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here