चंद्रपुर…
प्रतिकार…
- प्रतिनिधि….
🔷🔷रिपब्लिकनमगार सेना🔷🔷
*ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या मागण्यांना घेवून महावितरणचे मा. अधीक्षक अभियंता* यांची भेट.
*चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापक* म्हणून निवड करण्यात आलेल्या हजारो युवकांची नियुक्ती अद्यापही करण्यात आलेली नाही. आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यातील केवळ 60 युवकांची ग्राम विद्युत व्यवस्थापक या पदावर्ती प्रशिक्षण देवून नियुक्ती करण्यात आलेली होती. निवड झालेल्या उर्वरित हजारो युवकांना महावितरणने लवकरात लवकर प्रशिक्षण देवून *ग्राम विद्युत व्यवस्थापक* या पदावरती नियुक्ती देण्याच्या मागणीला घेवून *महावितरणचे मा. अधीक्षक अभियंता मॅडम यांना रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजी. तथागत पेटकर* यांनी कार्यकर्त्यांसह दिनांक 15 ऑक्टो रोजी भेट घेतली.
*याप्रसंगी रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हा महासचिव शेखर गव्हारे, राजुरा तालुकाध्यक्ष नुतेश सातपुते, महासचिव भारत शेडमाके, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष रवींद्र कोवे, पोंभूर्णा तालुकाध्यक्ष सत्यपाल येरमे, महासचिव नकुल देशमुख, संदीप ठाकूर, संदीप वासलवार, तेजराज वनकर, अनिल वेलादी, सुनील आत्राम महेंद्र सोनुले, तीलकचंद खारकर, विकास गुरणुले, मारुती भोंगळे, अनंता मोहूर्ले, यशवंत मेश्राम, संतोष बावणे* आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रतिकार न्यूज
बातम्या जाहिरात करीता
संपर्क7038636121