Home Covid- 19 नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कळमना येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन.

नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कळमना येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन.

34
0

नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कळमना येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील कळमना ग्रामपंचायत येथे जि. प. शाळेच्या प्रांगणात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्यात आले. कळमनाचे सरपंच तथा काँग्रेस ओबिसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिबिरात ८३ पैकी ८३ डोज देऊन शिबिर यशस्वी करण्यात आले.
या प्रसंगी पांढरपौणी उपकेंद्राच्या कुमारी प्रिया बनसोडे, सामुदायिक आरोग्य अधिकारी शेषराव मांडवकर, आरोग्य सेवक रेखा राऊत, लोणारे मॅडम, श्री. बटाळकर, कळमना तंमुसचे अध्यक्ष महादेव ताजने, उपसरपंच कौशल्या मनोहर कावडे, ग्रा प सदस्य सुनिता ऋषी उमाटे, रंजना दिवाकर पिंगे, प्रियंका मनोज गेडाम, साईनाथ भास्कर पिंपळशेंडे, दीपक भाऊजी झाडे, ग्रामसेवक नारनवरे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, निंबाळाचे पोलीस पाटील गोपाल पाल, मुख्याध्यापक दांगोटे सर, निंबाळा चे मुख्याध्यापक भोंगळे सर, गोवारदिपे सर, पेंदोर सर, गोखरे मॅडम, दूधे मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक महादेव पाटील पिंगे, विठ्ठलराव वाढई, उद्धव पाटील आस्वले, निलेश वाढई, प्रभाकर साळवे, मंगेश ताजने, शामराव चापले, नानाजी पाटील आंबीलडगले, मनोर कावडे, ग्रा प शिपाई सुनील मेश्राम, विठ्ठल नागोसे, आशा वर्कर कल्पना शिरसागर, अंगणवाडी सेविका लता शिरसागर याशिवाय कोरोना दक्षता समिती व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here