Home Covid- 19 सरपंच हरिदास झाडे यांचे हस्ते ग्रामपंचायत खामोना अंतर्गत मौजा माथरा येथे जिल्हा...

सरपंच हरिदास झाडे यांचे हस्ते ग्रामपंचायत खामोना अंतर्गत मौजा माथरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कोरोना लसीकरण शिबीर संपन्न….

29
0

आज दिनांक 08 जून 2021 रोजी ग्रामपंचायत खामोना अंतर्गत मौजा माथरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले. सकाळी 10 वाजता मा. सरपंच श्री. हरिदास झाडे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वझीर मॅडम, आरोग्य सेविका सौ. सुवर्णा आंबडे मॅडम, आरोग्य सेवक श्री. गोटमुखले साहेब आणि त्यांची चमू, ग्रामपंचायत सदस्य श्री. मारोती चन्ने व सौ. अल्का दिलीप वैद्य, ग्रामसेवक श्री. मिलिंद देवगडे, पोलीस पाटील श्री. सुरेश चहारे, अंगणवाडी सेविका श्रीमती गयाबाई मरसकोल्हे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. साईनाथ लोणारे व श्री. दिपक मादसवार आणि माथरा येथील प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. सर्वप्रथम ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. हरिदास झाडे यांना लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. दुपारच्या वेळी मा. गट विकास अधिकारी डॉ. रामावत सर यांनी लसीकरण केंद्रास भेट देऊन नागरिकांना प्रोत्साहित केले, त्याचे महत्त्व आणि फायदे समजावून सांगितले. त्याचा परिणाम आणि कोरोना दक्षता व लसीकरण समितीने घेतलेल्या मेहनतीमुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून लसीकरण 100℅ यशस्वी केले. केंद्रास प्राप्त झालेल्या 110 लसीचे लसीकरण पूर्णपणे करण्यात आले. स्वयंसहायता समूहाच्या महिलांनी देखील लसीकरणात हिरीरीने सहभाग घेतला. एकही लस परत न गेल्याचा आनंद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर परत जातांना स्पष्टपणे झळकत होता…

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here