Home आपला जिल्हा आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश : क्षेत्रातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात...

आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश : क्षेत्रातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे भरण्यास मंजूरी. विरूर स्टेशन, शेणगाव, नांदाफाटा व भंगाराम तळोधी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश.

202
0

आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश : क्षेत्रातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे भरण्यास मंजूरी.

विरूर स्टेशन, शेणगाव, नांदाफाटा व भंगाराम तळोधी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश.

राजुरा (ता.प्र) :– सतत दोन वर्षांपासून देशात आणि राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर नागरिक कोरोना बाधित झाले. या वर्षी परिस्थिती अधिक बिकट झाली. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अनेकांना वेळेवर उपचार मिळत नव्हते. क्षेत्रातील विरूर स्टेशन, शेणगाव, नांदाफाटा व भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधकाम पूर्ण झाले असतांना सुद्धा ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा वेळीच उपचार मिळत नाही ही वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक प्रमाणात कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आलेत. शेवटी त्यांच्या मागणीला यश येऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन , जिवती तालुक्यातील शेणगाव, कोरपना तालुक्यातील नांदाफाटा आणि गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे मंजूर करण्यात आली आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पदभरती मंजूरी संदर्भात नुकताच दिनांक ७ जून २०२१ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यात राजुरा विधानसभा क्षेत्रात वरील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ पदे याप्रमाणे एकूण ६० पदे भरण्यास मंजूरी दिली आहे. यात वैद्यकीय अधिकारी – २, आरोग्य सहाय्यक स्त्री व पुरुष -२, सहाय्यक परिचारिका – १, औषध निर्माण अधिकारी – १,कनिष्ठ लिपिक – १, प्रयोगशाळा अधिकारी – १, आरोग्य सहाय्यक – १, स्त्री परिचर – १, पुरुष परिचर – ३, वाहनचालक – १,सफाईगार – १ अशी १५ पदे प्रत्येक आरोग्य केंद्रात मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे क्षेत्रातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल, ग्रामिण भागातील जनतेला वेळवर व आपल्या नजिकच्या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here