Home Breaking News पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत युवक थेट पोहोचला पोलिस ठाण्यात

पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत युवक थेट पोहोचला पोलिस ठाण्यात

63
0

प्रतिकार न्युज नेटवर्क

By
निलेश नगराळे नागपूर द्वारा रिपोर्ट

नागपूर : नजर रोखून पाहिले म्हणून तिघांनी कल्पेश उर्फ दादा सूरज राबा १८ वर्षीय युवकाच्या पोटात चाकू खुपसला. जीव वाचविण्यासाठी त्याच अवस्थेत गंभीर जखमी झालेला युवक पोलिस ठाण्यात पोहचला. काही वेळ हा युवक पोटात चाकू भोसकलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनबाहेर फिरत होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. (Video of man with knife in stomach in Nagpur viral on social media)

जखमी कल्पेश उर्फ दादा सूरज राबा (१८) रा. गायकवाड लेआउट आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. कल्पेशचा मित्र कुणाल आणि सलमान यांच्यात वाद होता. कुणाल हा सलमानकडे नेहमीच रोखून पाहत असे. याच कारणावरून दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास समेट घडविण्यासाठी आरोपींनी कुणाल याला कपिलनगर येथील ताजुद्दीनबाबा दर्ग्याच्या बाजूला मोकळ्या जागेत बोलविले. त्यानुसार कल्पेश, त्याचा भाऊ विनय आणि मित्र कुणाल हे घटनास्थळी गेले.

तेथे पुन्हा वाद झाला असता आरोपींनी विनय आणि कुणाल यांना मारहाण केली. त्याचप्रमाणे कल्पेशच्या पोटावर चाकूने वार केला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी शेख इम्रान शेख चांद (२६), मो. राजीक उर्फ राजा मो. यासीन (२८), शेख जावेद शेख नवाब (२८) आणि शेख सलमान शेख नवाब (२३) सर्व रा. म्हाडा कॉलनी यांना अटक केली आहे. तसेच दोन विधी संघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस स्टेशन समोर बराच वेळ टाइमपास केल्यानंतर एका मित्राने कल्पेशला दुचाकीवर बसवून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला पोलिस वाहनात बसण्यास सांगितले. जवळपास २० मिनिटांनंतर पोलिसांनी जखमी कल्पेशला मेयोत नेले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

कल्पेश राबा हा पोटात चाकू भोकसल्यानंतर जीव वाचविण्यासाठी पळाला. तेव्हा त्याच्या पोटात चाकू तसाच होता. तो थेट कपिलनगर पोलिस ठाण्यात पोहचला. कल्पेश पोटात खुपसलेल्या चाकूवर हात ठेवून पोलिस ठाण्यासमोर हिंडत होता. या प्रकार कुणीतरी मोबाईलने शुट केला करून व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here