राजुरा…
प्रतिकार…
🔷 आदर्श शाळेत जागतिक हात धुवा दिवस
🔷वाचन प्रेरणा दिन संपन्न.
-,♦️ आभासी पधतीने स्कॉऊट-गाईड व राष्ट्रीय हरित सेना विभागाचा संयुक्त उपक्रम.
– विध्यार्थीचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
-♦️ घरी राहून विध्यार्थीनि घेतला उपक्रमात सहभाग.
राजुरा 15 ऑक्टोबर
केवळ हात न धूतल्यामुळे पोटात जंतु होणे ,डायरिया ,त्वचा आणि डोळ्यांचे अनेक आजार उद्भभवतात. ” हात नाही धुतला तर काय होते ” असे म्हणत अनेक मुले ,व्यक्ति हात न धूता अन्नपदार्थ खातात. मात्र भविष्यात त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी हात धुन्याची सवय लागावी ,हात धून्याचे फायदे -तोटे याबाबतीत नागरिकांमधे जनजाग्रुती व्हावी यासाठी 15 ऑक्टोबर ला ” जागतिक हात धूवा दिवस ” साजरा करण्यात येतो.
कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेबाबतच्या सर्व आवश्यक सवयिंचे पालन करने आवश्यक आहे. सध्या शाळा बंद असल्यातरी आभासी पधतीने (ऑनलाईन ) हात धून्याचे प्रात्यक्षिकाचे आणि वाचन प्रेरणा दीनानीमीत्य पुस्तके वाचन उपक्रमाचे आयोजन बादल बेले, छत्रपती स्कॉऊट यूनिट लिडर तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले होते. कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणे आणि गर्दी टाळने या सवयिबरोबरच वारंवार हात स्वच्छ करने किती आवश्यक आहे याबद्दल सरकारकडून माहिती दिली जातच आहे. मात्र जागतिक हात धुवा दिवसा नीमीत्याने चांगल्या सवयीमुळे आजारांपासुन बचाव कसा केला जाऊ शकतो हे विध्यार्थीना शिक्षकांनी सांगणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. यावेळी आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे ,आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर ,बालवाडीच्या मुख्याध्यापिका मंगला मोरे , सहाय्यक शिक्षक रुपेश चिड़े आदींसह शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. वाचन प्रेरणा दीना नीमीत्य मुख्याध्यापक जांभूळकर व पिंगे यांनी पुस्तके वाचनाची सवय आणि त्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. तर आभार रोशनी कांबळे यांनी केले.