Pratikar News
नागपूर : गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीवर दोघे भावंडे आणि त्यांचा मित्र अशा तिघांनी बलात्कार केला. ही खळबळजनक घटना गिट्टीखदान भागात उघडकीस आली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध अत्याचार, विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. वॉल्टर पांडे (वय ३२) त्याचा भाऊ रोमारियो (वय २५) व मित्र आकाश गजानन टाले (वय २६, तिन्ही रा.मानवसेवानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पीडित १४ वर्षीय मुलगी नववीत शिकते. ती आई-वडिलासह गिट्टीखदान भागात राहाते. तिचे वडील खासगी काम करतात. काही दिवसांपूर्वी वॉल्टर याने मुलीला धाकदपट करून तिला एकांतात नेले. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पांडेने त्याचा भाऊ रोमारियो व आकाश याला सांगितले. त्यानंतर दोघांनीही तिचे शारीरिक शोषण सुरू केले.
तिघांचाही नेहमीचाच अत्याचारामुळे ती त्रस्त झाली होती. मुलीने आई-वडिलाला माहिती दिली. त्यानंतर मुलीने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी मानकापूर पोलिसांनी अत्याचार प्रकरणात आकाश याला अटक केली होती. तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने मुलीचे शोषण केले. तिघेही कुख्यात असून दहशतीमुळे त्यांच्याविरोधात कुणी जात नसल्याचे बोलले जाते.