Home Breaking News चंद्रपुरात शिवराज्याभिषेक दिन साजरा

चंद्रपुरात शिवराज्याभिषेक दिन साजरा

12
0

Pratikar News

चंद्रपूर – शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तथा सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे आज 347वा राज्यभिषेक दिन स्टुडंट्स केअर इन्स्टिट्यूट मध्ये साजरा करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराजांनी रयतेला यथायोग्य सन्मान देऊन नीतिनियमाने राज्यकारभार करून आदर्श पायंडा पाडला.

यावेळी शरद पवार विचार मंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशकर, जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रिंगणे, शरद पवार विचार मंच जिल्हा उपाध्यक्ष संजय तुरीले, प्रभाग अध्यक्ष मंगेश बोकडे, निलेश बोबडे उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here