Home Breaking News राजीव गांधी इंजिनिअरींग कॉलेजमधील प्राध्यापक इफ्तेखार खान यांच्यावर सुनेच्या छळवणूक प्रकरणी गुन्हा...

राजीव गांधी इंजिनिअरींग कॉलेजमधील प्राध्यापक इफ्तेखार खान यांच्यावर सुनेच्या छळवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

56
0

Pratikar News

चंद्रपूर : – सरदार पटेल मेमोरीअल सोसायटी द्वारे संचालित राजीव गांधी इंजिनिअरींग कॉलेज मधील सिव्हील डिर्पाटमेंटमध्ये नौकरीला असलेले प्रा. इफ्तेखार खान यांच्यावर अमरावतीच्या नागपूरी गेट पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्या सुनेने दाखल केलेल्या तक्रारीवरून भा.दं.वि. च्या कलम ४९८ अ. ४०६, ३२८, ३४ सहकलम ४ अंतर्गत १ एप्रिल २०२१ ला गुन्हा दाखल झाला होता त्यासाठी त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी व पुढे १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होतो. प्रकरण अतिशय गंभीर आहे कारण हुंडा व सुनेचा छळ तसेच सुनेच्या जिवास हानी पोहचविणारी औषधी देणे अशा गंभीर प्रकारचे आरोप आहे. अशा प्रकारच्या गुन्हयात ५ दिवस पोलिस कोठडीत व १५ दिवस न्यायालयीन कोठडी असलेल्या या प्राध्यापकांवर या संस्थेचे श्री. शफीक अहमद व प्राचार्य श्री. जावेद खान यांनी सदर प्राध्यापकावर कुठलेही कारवाई केलेली नाही उलट हे प्रकरण दाबून ठेवले. याआधी याच कॉलेजमध्ये प्रशासकीय अनियमितता, अकार्यक्षमता असे कारण दाखवून तिथे कर्मचा-यांवर निलंबन तसेच वेतनवाढ रोखणे अशी कारवाई या दोघांनी केलेली आहे. मग नेमके हेच प्रकरण यांच्या नजरेतून कसे सुटले ? यावरून असे दिसते की स्वतःच्या मर्जीतील लोकांच्या गंभीर गुन्हयाना देखील हे महाशय पाठीशी घालतात आणि इतरांवर मात्र छोटया छोटया बाबमध्ये व्देषपूर्ण कारवाई करतात.
४८ तास पोलीस कस्टडीत असलेल्या आरोपीला निलंबित करावे लागते हा प्राध्यापक मात्र २० दिवस तुरुगांत होता व महिला उत्पीडन सारखे गंभीर आरोप असलेल्या स्वतःच्या मर्जीतील लोकांना पाठीशी घालणे, कुठलेही कारवाई न करणे यामध्ये यांची मानसिकता सुध्दा गुन्हेगारीची आहे असे दिसून येते. महिलांविरूध्द अपराध करणे सुनेचा छळ करणे, औषधाद्वारे विष प्रयोग करणे असा आरोप असलेला व्यक्ती जर प्राध्यपकाची नौकरी करत असेल तर या जिल्हयातील मुलीनी अशा कॉलेजमध्ये प्रवेश का घ्यावा ? व्यवस्थापन व प्राचार्य अशा वृत्तीच्या लोकांचे संरक्षण करीत असतील तेव्हा हे प्राध्यापक कॉलेजमध्ये पण महिला व विद्यार्थीनीच्या बाबतीत काय विचार करीत असतील याची कल्पना करवत नाही अशी लाजिरवाणी बाब आहे. बचाव करणा-या प्राचा-यांवर व अध्यक्षांवर प्रशासकीय कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे या विषयाचे निवेदन संस्थेच्या अध्यक्षांना देण्यात आलेले आहे. तसेच मा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मा. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, मा. कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना सुध्दा निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहे. निवेदन देण्यात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्याध्यक्ष सौ. चारूलता बारसागडे, सौ. प्रिती लभाणे, सौ. सारीका रामटेके, अजिता मेश्राम व नम्रता रायपुरे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here