Home Breaking News प्रेयसीची अश्लील चित्रफीत तिच्या वाढदिवशी फेसबुकवर केली व्हायरल

प्रेयसीची अश्लील चित्रफीत तिच्या वाढदिवशी फेसबुकवर केली व्हायरल

115
0

Pratikar News

बल्लारपूर – :- मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रेम प्रकरणात मिठाचा खडा पडला.
त्यामुळे दोघात भांडण झाले. प्रेमातील भांडण अखेर विकोपाला गेलं. प्रियकराच्या मनात प्रेयसीचा सूड काढण्याचा विचार आला. भेटीसाठी जंगलात नेत तिच्यावर बलात्कार केला,
आणि बलात्काराची चित्रफीत वाढदिवसाच्या दिवशी बनावट फेसबुक आयडी’च्या माध्यमातून फेसबुकवर सर्वत्र व्हायरल केली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीला अखेर अटक करण्यात आली.
बल्लारपूर शहरात शिवाजी वार्ड येथे राहणारा सन्मुखसिंग बुंदेल (25) या तरुणाचे शहरातील एका 29 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या अश्यातच प्रेमात मिठाचा खडा पडला. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. मनात सुडाची भावना निर्माण झाली. आणि प्रेयसीला धडा शिकवण्याचा मनात विचार केला. 1 जून रोजी फिरायला जायचे आहे म्हणून, त्याने पीडित प्रेयसीला जंगलात नेले. तिच्यावर बलात्कार केला. आणि या सर्व कुकर्माचे छायाचित्र आणि व्हिडीओ तयार करून. काल प्रेयसीच्या वाढदिवसाच्याचं दिवशी त्याने मलोहत्रा नावाने बनावट फेसबुक आयडी बनवून ही छायाचित्र आणि चित्रफीत फेसबुकवर सर्वत्र व्हायरल केले. प्रियकराने केलेल्या प्रकाराची प्रेयसीला माहीती होताच तिने पोलीस स्टेशन गाठले. आणि आपबीती सांगितली. पीडित फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सन्मुखसिंग बुंदेल यांच्याविरोधात बलात्कार, ॲट्रॉसिटी, ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहेत. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी राजा पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे करीत आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here