Home आपला जिल्हा शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कोलामगुड्यावर धान्य कीटचे वाटप* स्व....

शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कोलामगुड्यावर धान्य कीटचे वाटप* स्व. कु. स्नेहल प्रभाकरराव दिवे यांचा पाचवा स्म्रुतीदिन.

53
0

*शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कोलामगुड्यावर धान्य कीटचे वाटप*
स्व. कु. स्नेहल प्रभाकरराव दिवे यांचा पाचवा स्म्रुतीदिन.

राजुरा, ता. ५ – गरजूंना आवश्यक समयी मदतीचा हात देवून त्यांना आधार देण्याची परंपरा दिवे परिवारानी सदोदीत जपली आहे. स्वर्गिय कु. स्नेहल प्रभाकरराव दिवे हिच्या मनातील समाजसेवेच्या उदात्त भावनेची परंपरा तिच्या मरणोपरांत तशीच तेवत राहावी व गरीब- गरजूंच्या सेवेचे व्रत समाजातील अनेकांना प्रेरणादायी ठरावे असे मत माजी आमदार तथा अँड. वामनराव चटप यांनी व्यक्त केली.
स्वर्गिय कु. स्नेहलच्या पाचव्या स्म्रुती दिनाप्रित्यर्थ दिवे परिवार व शेतकरी संघटनेच्या वतीने जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला.
अँड. चटप म्हणाले, सध्या कोरोनाच्या महामारीने अनेक कुटूंब अडचणीत आले आहेत. काहींनी आपले आप्तेष्ट गमावलेत. तर काही जणांपुढे रोजगारीचे संकट उभे राहीले आहेत. अशा कठीण प्रसंगी एकमेकांचे सहकार्य करण्याची भावना समाजातील प्रत्येकाने अंगिकारण्याची गरज आहे.
शेतकरी संघटना व दिवे परिवाराच्या वतीने राजुरा तालुक्यात शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम अशा बागुलवाई कोलामगुड्यावरील बत्तीस कुटूंबांना आज (ता.५) तूर दाळ, साखर, तेल, तिखट, मीठ, आलू, कांदे, साबण, बिस्कीट अशा जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राजुरा बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस, नगरसेवक भाऊजी कन्नाके व मधूकर चिंचोलकर, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख कपिल इद्दे, तालुका उपाध्यक्ष दिलीप देठे, मनोज मून, भीमराव बंडी, ऋषी बोरकुटे, मधूभाऊ जिवतोडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आदिम कोलाम बांधवांना मदतीचा हात देऊन सहकार्य केल्याबद्दल बागूलवाईचे गावपाटील भोजू जंगू आत्राम व अन्य कोलाम माता भगिनी व बांधवांनी समाधान व्यक्त केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here