Home क्राइम स्कुटीने जात असलेल्या पंढरी ताजणे (वय ६०) यांना मागून कोळसा वाहतूक करणाऱ्या...

स्कुटीने जात असलेल्या पंढरी ताजणे (वय ६०) यांना मागून कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी …

64
0

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

राजुरा : राजुरा गोवरी मार्गावरील माथरा गावसमोरील रेल्वे क्रॉसिंग जवळ दुपारी २.३० वाजता स्कुटीने जात असलेल्या पंढरी ताजणे (वय ६०) यांना मागून कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे उपचार सुरु आहे.

राजुरा परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोळीच्या खुल्या व भूगर्भातील कोळसा खाणी आहे. याठिकाणी कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु असते. राजुरा-गोवरी-साखरी मार्गावर बहुतांश वाहतूक हि कोळसा वाहतुकीची आहे. आज (दि. ३) दुपारी राजुराकडून चिंचोलीकडे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३४ बी. क्यु. २३२१ जात असलेल्या पंढरी ताजणे (मु चिंचोली) यांना त्यामागून गोवरी डीप येथे कोळसा भारण्याकरिता जात असलेले ट्रक क्रमांक एम एच ३४ ए व्ही. २७०२ या वाहनाने रेल्वे क्रॉसिंग जवळील वळण रस्त्यावर धडक दिली असता पंढरी ताजणे यांच्या पायाला जबर मर लागला असून त्यांना उपचाराकरिता राजुरा येथिल दवाखान्यात दाखल केले असून ट्रक चालक फरार झाला आहे.

यावेळी माहिती मिळताच शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, भाजपा सहसचिव हरिदास झाडे, रमेश झाडे यांनी धाव घेऊन जखमींना नुकसान भरपाई भरपाई देण्यात यावी,अवैध कोळसा वाहतूक सुरु असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली असून समोरील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here