Home शैक्षणिक ग्रामपंचायत संगणापूर येथील नविन शाळा इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन कविता भगत जी.प.सदस्य यांचे...

ग्रामपंचायत संगणापूर येथील नविन शाळा इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन कविता भगत जी.प.सदस्य यांचे हस्ते पार पडले* *भुमिपुजन सोहळ्यात शाळेतील कार्यरत शिक्षक व ग्रामसेवक मात्र चक्क गैरहजर*

76
0

*भौतिक सुविधांमुळे विद्यार्थी विकास शक्य*
(सौ.कविता प्रमोद भगत जि.प.सदस्य)
*ग्रामपंचायत संगणापूर येथील नविन शाळा इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन कविता भगत जी.प.सदस्य यांचे हस्ते पार पडले*

*भुमिपुजन सोहळ्यात शाळेतील कार्यरत शिक्षक व ग्रामसेवक मात्र चक्क गैरहजर*

चामोर्शी सुखसागर झाडे:- शाळा हे औपचारिक शिक्षणाचे केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत भौतिक सुविधा असते गरजेचे आहे. यातून शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास शक्य आहे . असे मत मौजा सगणापुर येथील शाळेच्या नविन इमारत बांधकाम भुमिपुजन सोहळ्यात त्या व्यक्त करीत होत्या.ग्रामपंचायत संगणापूर येथील गावकऱ्यांनी गावातील शाळेची इमारत जीर्ण झालेली असून एका इमारतीची अतिशय आवश्यकता असल्याचे जी प सद्स यांना मागणी केली असता,जी.प.सद्स यांनी तात्काळ पाठपुरावा करीत जिल्हा परिषद मधून शाळा इमारत मंजूर करून आज रीतसर भूमिपूजन केले ।यावेळी सरपंच पार्वता कन्नाके।उपसरपंच रेवती पोरटे।सद्स धनराज सेलोटे।शाळा व्यवस्थापन सभापती व गावकरी उपस्थित होते.
मात्र यावेळी पुर्वसुचना देऊन सुध्दा ग्रामसेवक व शिक्षक गैरहजर होते. सदर ग्रामसेवक व शिक्षक हे मुख्यालय राहत नसून ते सदर ठिकाणी वारंवार गैरहजर राहत असल्याचे गावातील नागरिकांनी मत व्यक्त करीत याबाबत गावकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली. यावेळी तात्काळ पं.स.चामोर्शीचे बिडिओ साहेब व शिक्षण अधिकारी यांचेशी चर्चा करून सदर माहिती दिली. संबंधित ग्रामसेवक व शिक्षक मुख्यालय न राहता कार्यरत ठिकाणी वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना रीतसर तक्रार करून कारवाही ची मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here