Home Breaking News जखमी वाघावर उपचार करायला जाणाऱ्या पथकावर वाघाचा हल्ला,,, * पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत...

जखमी वाघावर उपचार करायला जाणाऱ्या पथकावर वाघाचा हल्ला,,, * पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे जखमी*

267
0

जखमी वाघावर उपचार करायला जाणाऱ्या पथकावर वाघाचा हल्ला,,,
* पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे जखमी*

राजुराचंद्रपूर (संतोष कुंदोजवार-)- ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मधील बफर क्षेत्रातील मुल वनपरिक्षेत्राचे जाणाळा उपक्षेत्रातील डोनी गावाजवळ वनक्षेत्रात एका जखमी वाघाला बेशुद्धावस्थेत आणून उपचार करण्यासाठी गेलेल्या पथकावर वाघाने हल्ला केला यात पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे यांचे पायाला वाघाने पकडल्याने पायाला गंभीर दुखापत झाली असून थोडक्यात बाचावल्याची घटना आज घडली
काल या वनक्षेत्रात दिन वाघाची जोरदार झुंज झाली होती त्यात एक वाघ जखमी झाल्याने त्याच भागात बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे, गावातील नागरिकांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली ,माहिती मिळताच वरिष्ठ वणाधिकार्याच्या मार्गदर्शनात वनविभागाची चमू व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ . रविकांत खोब्रागडे हे डोनी गावात पोहचले . त्या वाघावर वनविभाग मागील 2 ते 3 दिवसापासून पाळत ठेवून होतेच . सदर चमू वाघाजवळ पोहचले असता अचानक वाघाने हल्ला चढविला , अचानक झालेल्या हल्ल्यात सर्व सैरावैरा पळू लागले , पळताना डॉ .रविकांत खोब्रागडे हे खाली पडले , वाघाने डॉ . खोब्रागडे यांच्यावर हल्ला चढविला , आणि त्यांचा एक पाय जबड्यात पकडले असता झटका देऊन सुटका करताच दुसरा पाय वाघाने पकडले त्यामुळे
दुसऱ्या पायाला गंभीर इजा झाली . सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्यावर तो वाघ पळून गेला , जखमी डॉ .रविकांत खोब्रागडे यांना शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here