Home Breaking News अशी नको ग सुनबाई ???

अशी नको ग सुनबाई ???

77
0

Pratikar News

पोलिसांनी सुनेला ठोकल्या बेड्या

जळगाव : घरगुती भांडणातून सूनेनेच सासूच्या डोक्यात व पाठीवर विळयाने वार करुन तिचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास प.क.कोटेचा विद्यालयाच्या आवारात घडली . प्रकरणी सून उज्ज्वला सोनवणे ( ३८ ) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . या द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे ( ७५ ) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे . मिळालेल्या माहितीनुसार , रवीद्र सोनवणे हे कोटेचा विद्यालयात सुरक्षा रक्षक आहेत . शाळेच्या परिसरातच ते आई , पत्नी उज्ज्वला हिच्यासह वास्तव्यास आहेत सकाळच्या सुमारास रवींद्र हा काही साहित्य घेण्यासाठी गावात गेला होता . त्याचवेळी द्वारकाबाई व सून उज्ज्वला यांच्यात भांडण झाले . हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की सूनेने धारदार विळ्याने सासूची मान , डोके व पाठीवर जोरदार वार केले . अचानक झालेल्या या हल्ल्यात द्वारकाबाई जागीच ठार झाल्या . काही वेळाने रवींद्र हा घरी परतला . त्यावेळी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली . यानंतर रवींद्र हा ओळखीच्या नगरसेवकाकडे गेला . नगरसेवकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली . यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here