Home आपला जिल्हा भाजीपाला विक्री करणारे व मनपा कर्मचाऱ्यात आज चांगलीच जुंपली, आता आम्ही...

भाजीपाला विक्री करणारे व मनपा कर्मचाऱ्यात आज चांगलीच जुंपली, आता आम्ही चोऱ्या करायच्या काय?

14
0

Pratikar News

चंद्रपूर – कृषी उत्पन्न बाजार समिती समोर भाजीपाला विक्री करणारे व मनपा कर्मचाऱ्यात आज चांगलीच जुंपली, मनपा कर्मचाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांना मार्गावरून हटण्यास सांगितले मात्र वाद इतका वाढला की काही भाजी विक्रेत्यांनी आपली भाजी रस्त्यावर फेकून दिली.

कोरोना काळात मागील 2 महिन्यापासून सर्वांच्याया रोजगाराचा प्रश्न उदभवला आहे, सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाजी विक्री सुरू असते.

आपल्या पोटाची खळगी भागविणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी दाताला रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भाजी विकणे सुरू केले.
साहजिकच आहे भाजी घ्यायला नागरिक गर्दी करणारच मात्र ही गोष्ट पालिकेतील महत्वाच्या पदावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात खुपली व 26 मे ला पालिकेत अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना तो मार्ग मोकळा करण्यास सांगितला.
2 जून ला सकाळी मनपा कर्मचारी मार्ग मोकळा करण्यासाठी तिथे पोहचले असता भाजी विक्रेत्यांसोबत त्यांचा वाद झाला.
मनपाच्याया विरोधाला कंटाळीत काही भाजी विक्रेत्यांनी आपली भाजी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली, 2 पैसे कमविण्यासाठी भाजी विक्रेते सकाळी भाजी विक्री करतात मात्र ती बाब सुद्धा पालिकेतील पदाधिकाऱ्यांना खुपली, याचा राग म्हणून काही विक्रेत्यांनी तर आता आम्ही चोऱ्या करायच्या काय असा आक्रोश केला.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here