Home Breaking News मौलाना कडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार -मौलाना आहे चार मुलांचा बाप

मौलाना कडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार -मौलाना आहे चार मुलांचा बाप

34
0

Pratikar News

नवी दिल्ली – उत्तर पूर्व दिल्लीच्या हर्ष विहार परिसरातील एका मौलानाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाणी भरायला आलेल्या लहान मुलीसोबत त्याने हे दुष्कृत्य केलंय. त्यानंतर, कुणालाही न सांगण्याची धमकीही दिली होती. मात्र, पीडित मुलीने घरी जाऊन घडलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे, परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

धार्मिक स्थळाच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांची गर्दी आणि संताप पाहून आरोपी मशिदीच्या मागील दरवाज्यातून फरार झाला.

मात्र, पोलीत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला इलियास (४८) यास लोनी गाझियाबाद येथून अटक केली. विशेष म्हणजे आरोपी विवाहित असून त्याचा 4 अपत्ये आहेत.

अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसमवेत हर्ष परिसरात राहते. आई-वडिलांसह इतरही सदस्य असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब आहे. घरातील पाणी संपल्यामुळे ही मुलगी रविवारी संध्याकाळी शेजारी असलेल्या मशिदीमध्ये बादली घेऊन पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी, मशिदीत इलियास एकटाच होता, त्याने मुलीला पाहून एका खोलीत बोलावून नेले. त्यानंतर, तीला बांधून तिच्यावर बलात्कार केला. तसेच, याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना ठार करेल, अशी धमकीही दिली. मात्र, पीडितेनं तिच्या कुटुंबीयांना याबाबत सांगितले. त्यानंतर, स्थानिकांनी एकत्र येऊन मशिदीवर गर्दी केली होती.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here