Home राज्य भारतीय संविधानाने दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर जमातीला कोर्टातूनच मिळेल..

भारतीय संविधानाने दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर जमातीला कोर्टातूनच मिळेल..

23
0

धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण कोर्टातून मिळेल
— कैलास उराडे
राजुरा, वार्ताहर –
भारतीय संविधानाने दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर जमातीला कोर्टातूनच मिळेल. आजपर्यंत राजकीय पक्षांनी भूलथापा देऊन आपल्याला फसविले, परंतु आता धनगर फसणार नाही तर हक्काची लढाई न्याय मिळेपर्यंत सुरूच ठेवेल, असे प्रतिपादन प्रबोधन मंचाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष कैलास उराडे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
धनगर जमात मंडळ, राजुरा च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात २९६ वी जयंती कोविड नियम पाळून गणमान्य लोकांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी संध्या ढवळे, गणपत बोधे, गोपाळ बुरांडे, बळीराम खुजे, रुपेश चीडे, विठोबा तेलंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या जयंतीच्या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धाचा निकाल घोषित करण्यात आला व विजेते द्रौपदी पोतले, ज्योती गोंडे , वनिता उराडे, सचिन झाडे, प्रणाली तुराळे,दर्शना पोतले यांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी अहिल्यादेवीचा इतिहास आणि समाजासाठी आदर्श असलेल्या कार्याची माहिती सांगून समाजाने आता मानसिक आणि राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडले पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन धनंजय डवरे व आभार बंडू पोतले यांनी मानले. यशस्वीतेसाठी दिनेश पोतले, दशरथ धवणे, मधुकर गाडगे, रामदास दवंडे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here