ईपीएस-95 पेंशनधारकांनी केले एक दिवसीय उपवास आंदोलन
पंतप्रधानाकडे उपोषणाचा फोटो पाठवून मागण्या माण्य करण्याची केली विनंती
राजुरा- महागाईच्या काळात अल्पशा पेंशनमुळे उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अल्प पेंशन, कुठलाही महागाई भत्ता नाही किंवा वैद्यकीय सुविधाही नाही अशा परिस्थितीत सन्मानपूर्वक जगण्यास असमर्थ ठरत असलेल्या ईपीएस ९५ पेंशन धारकांनी मागील अनेक वर्षापासून राष्ट्रीय संघर्ष समिती च्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने केलीत परंतू न्याय मिळाला. नाही. अखेर देशातील ६७ लाख ईपीएस-९५ पेंशन धारकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत काल (दि. १) एक दिवसीय उपवास आंदोलन करीत आंदोलनाचा फोटो आपल्या क्षेत्राचे खासदार आणि देशाच्या पंतप्रधानाकडे इ-मेल च्या माध्यमातून पाठवित आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मागण्या माण्य करण्याची विनंती केली. देशातील विविध महामंडळ, खाजगी उद्योग, सहकार क्षेत्रात काम केलेल्या सुमारे ६७ लाख ईपीएस ९५ पेंशनधारक केवळ ३०० ते ३ हजार रूपयापर्यंत पेंशन मिळते. त्यावर कुठल्याही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही. अशा स्थितीत सम्मानपूर्वक जगण्यास अडचण निर्माण होत आहे. ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वात या पेंशनधारकांनी विविध प्रकारची आंदोलने केली. समितीच्या मुख्यालयी बुलढाणा येथे मागील ८९१ दिवसापासून साखळी उपोषणही सुरू आहे. मात्र आजपर्यंत या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतल्या गेली नाही व पर्यायाने कोरोनाच्या या कठीण काळात अनेक पेंशनधाकर सम्मानजनक पेंशनची वाट पाहत हे जग सुद्धा सोडून गेले. सरकारचे लक्ष वेधण्याचे आणखी एक प्रयत्न म्हणून काल (दि.१) ईपीएस ९५ पेंशनधारकांनी एक दिवसीय राष्ट्रव्यापी उपोषण कार्यक्रम हाती घेऊन देशातील ६७ लाख पेंशनधारकांनी कुटूंबीयांसोबत आप आपल्या घरी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपवास करत आंदोलन केले. जिल्हयातही शेकडो वृद्ध पेंशनधारकांनी एक दिवसीय उपवास आंदोलन करून आंदोलनाचा फोटो क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेल द्वारे पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली. या आंदोलनात ईपीएस-१५ राष्ट्रीय संघर्ष समिती शाखा चंद्रपूर चे अध्यक्ष परशुराम तुंडूलवार उपाध्यक्ष रामचंद्र मुसळे, सचिव दयाशंकर सिंग, पुंडलीक मोहुर्ले, सुभाष शहा, संदिप गड्डमवार, गुलाब ठाकरे, किशोर ठाकरे, मनोहर टाके, अरुण जमदाडे, महादेव परचाके, तुळशीराम बनवाडे, सय्यद अख्तर, कवडू डेरकर, अरूण लांडे, प्रभाकर कुक्षिकांतवार, जगदिश भशाखेत्री, मधुकर वाहने, धनंजय दास सह शेकडो पेंशनधारकांनी सहभाग नोंदविला.