Home राष्ट्रीय एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पंचारत्नाना शासकीय नौकरी द्या 🌷 ...

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पंचारत्नाना शासकीय नौकरी द्या 🌷 सुदर्शन निमकर

50
0

राजुरा…

  • मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करणार-या पंचरत्नांना

    शासकिय नोकरीत सामावून घ्यावे
    माजी आमदार सुदर्शन निमकर यांची मागणी

राजुरा- मिशन शौर्य-2018 अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करणा-या आदिवासी पंचरत्नांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागाअंतर्गत शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे तत्कालिन अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आम. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, पुढाकारातून व अथक प्रयत्नातुन व चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी मा. आशुतोष सलिल तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे तत्कालिन प्रकल्प अधिकारी मा. डि. दयानिधी राजा यांच्या उत्कृष्ठ नियोजनातून आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या संंयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या मिशन शौर्य-2018 च्या पहिल्या टप्प्यातील उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्हृयातील राजुरा विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाज्या कोरपना व जिवती या अतिदुर्गम आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागातील दहा आदिवासी विद्याथ्र्यांनी गिर्यारोहणासाठी भाग घेतला होता.
त्यातील पाच विद्याथ्र्यांनी जागतीक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करून यशाचा झेंडा रोवून महाराष्ट्राची, चंद्रपूर जिल्ह्याची आणि आदिवासी विकास विभागाची मान अभिमानाने उंचाविली होती. या आदिवासी विद्याथ्र्यांच्या विक्रमी कामगीरीबद्दल भारत देशाचे राष्ट्रपती सन्मा. रामनाथ कोविंद, देशाचे पंतप्रधान सन्मा. नरेंद्रजी मोदी, देशाचे तत्कालिन गृह मंत्री तथा संरक्षण मत्री सन्मा.राजनाथ सिंग, गृहराज्य मंत्री सन्मा. हंसराजजी अहिर, राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री सन्मा. देंवेद्र फडणविस, राज्याचे तत्कालिन अर्थ, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार तत्कालिन आदिवासी विकास मंत्री सन्मा. प्रा. अशोक उईके, मा. आयुक्त, मा. जिल्हाधिकारी यांच्या सह संबंधित सर्व अधिका-यांनी सन्मानित करून सन्मानचिन्ह व शासनाकडून या शौर्य विरांना प्रत्येकी 25 लक्ष रूपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले होते व शासना कडून शिक्षण पात्रतेनुसार गृहविभागात नौकरी देण्याचे ठरविण्यात आले होते.
परंतू अजूनही त्यांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने आता कु. मनिषा धर्मा धुर्वे, उमाकांत सुरेश मडावी, प्रमेश सिताराम आडे, कविदास पांडूरंग काटमोडे आणि विकास महादेव सोयाम या सर्व शौर्य विरांनी विनंती अर्जाद्वारे नोकरी देण्याची मागणी केलेली असून त्यांनी केलेली मागणी त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता अत्यंत रास्त असून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी नोकरीची आवश्यकता आहे. या पाचही एव्हरेस्ट विरांना त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार गृह खात्यात पोलीस-शिपाई किंवा इतर तत्सम पदावर त्यांच्या शौर्याचा गौरव म्हणून विशेष बाब या सदराखाली शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शासन व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या जाहिरात करिता

सम्पर्क 7038636121

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here