कारच्या धडकेत एक ठार एक जखमी,,,गडचांदूर मार्गातील खामोना जवळील घटना
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
वासुदेव जुंनघरे आणि अजय चौधरी हे दोघे मामा भाचे राजुरा येथून शेतीचे बियाणे खरेदी करून पाचगावला जात असताना खामोना जवळील गडचांदूर मार्गावर जिनिग जवळ मागून येणाऱ्या भरधाव कार ने धडक दिल्याने दुचाकीवरील मागे बसून असलेले वासुदेव जुनघरे हे दुचाकीवरून पडलेत आणि मागेच असलेल्या कारने जोर धक्का दिला त्यात ते जागीच ठार झाले तर दुचाकी चालक अजय चौधरी हा गंभीर जखमी झाला
अपघात होताच कार चालक लगेच घटनास्थळावरून फरार होऊन पोलीस स्टेशनला हजर झाले आणि घटनेची हकीकत सांगितले माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करीत जखमीला उपचारार्थ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले तर मृतकाचे शव उत्तरीय कार्यवाहिस पाठविले असून पुढील तपास सुरू आहे
कार चालकांनी नुकतीच नवीन कार खरेदी केली आहे कार मालकाचे नाव नवनाथ बुटले राहणार राजुरा असून कार नेमका कोण चालवीत होता हे मात्र वृत्त लिहिपर्यत समजू शकले नाही.
Home Breaking News कारच्या धडकेत वासुदेव जूनघरे जागीच ठार… एक जखमी,,,गडचांदूर मार्गातील खामोना जवळील घटना