Home Breaking News 1 लाख 10 हजारांची लाच घेताना सरपंच व उपसरपंचास रंगेहात अटक

1 लाख 10 हजारांची लाच घेताना सरपंच व उपसरपंचास रंगेहात अटक

60
0

Pratikar News

गडचिरोली/चामोर्शी – गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील नेताजीनगर ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचास 1 लाख 10 हजारांची लाच स्वीकारताना 31 मे ला रंगेहात अटक करण्यात आली.
नेताजीनगरला नाली बांधकाम, सिमेंट काँक्रिट रस्ता व सिंचन बंधारा कामाचे एकूण मंजूर बिल 22 लाखांच्या चेकवर स्वाक्षरी करण्यासाठी सरपंच 52 वर्षीय गोपाल नगेन रॉय, उपसरपंच 35 वर्षीय संजीत कांचन भट्टाचार्य यांनी 2 लाख 20 हजारांची लाच तक्रारदाराला मागितली.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
लाचेच्या 2 लाख 20 हजारांच्या रकमेपैकी तडजोडीअंती 1 लाख 10 हजार रुपये देण्याचे ठरले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत सरपंच व उपसरपंच यांना 1 लाख 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस कर्मचारी नथ्थू धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले यांनी यशस्वीपणे पार पाडली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here