Home आपला जिल्हा साखरवाही ते अहेरी पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून अखेर ग्रामस्थानी केला मोकळा? *गैरअर्जदाराकडून...

साखरवाही ते अहेरी पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून अखेर ग्रामस्थानी केला मोकळा? *गैरअर्जदाराकडून ग्रामस्थाना धमकी,तहसीलदारांनी मध्यस्ती करण्याची मागणी*

54
0

कुंदोजवार संतोष: साखरवाही ते अहेरी पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून अखेर ग्रामस्थानी केला मोकळा?
*गैरअर्जदाराकडून ग्रामस्थाना धमकी,तहसीलदारांनी मध्यस्ती करण्याची मागणी*
राजुरा (संतोष कुंदोजवार)-

साखरवाही ते अहेरी या गावाकडे जाण्यासाठी तलाठी नकाशावर अनेक वरश्यापासून पांदण रस्ता आहे साखरवाही येथील 60 पेक्षा अधिक शेतकऱ्याचा हा रहदारीचा रास्ता आहे परंतु पावसाळ्यात या रस्त्यावरून जनावरे व शेतकऱयांना जाण्यास मोठी कसरत करावी लागते चिखलातून जाताना बर्याच शेतकर्याचे बैलाचे पाय मोडलेले आहेत दरम्यान या रस्त्याचे श्रमदानातुन या शेतकऱयांनी रस्त्यावर दगड आणि मुरूम टाकून रस्त्याचे तात्पुरती मजबुतीकरण करीत आहे अश्यातच या रस्त्यालगत असलेल्या मधुकर नळे,शंकर नळे,भारत नळे शेतकऱ्यानी आडकाठी आणीत हा रस्ता बंद केला त्यामुळे त्याबाबत साखरवाही येथील शेतकऱयांनी तहसीलदार राजुरा यांना तक्रार,निवेदन देऊनही कोणतीही कारवाइ केली नाही अखेर समस्त गावकार्यानी बंद केलेला सार्वजनिक रास्ता मोकळा केला आणि श्रमदानातून या रस्त्यावर दगड मुरूम टाकले जात आहे असे असतानाही गैरअर्जदार शेतकरी मात्र या मार्ग पुन्हा बंद करण्याची धमकी देत संभडीत शेतकऱयांना अश्लील शिवीगाळ करीत आहे त्यामुळे अखेर परत एकदा तहसीलदार राजुरा यांना निवेदन देऊन रेकोर्ड नुसार असलेला हा पांदण रस्ता सार्वजनिक रित्या मोकळा करून द्यावा अन्यथा गावात या विषयावरून शांतता भंग होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही असा इशारा या शेतकऱयांनी दिला आहे
याबाबत उपसरपंच बंडू नगराळे,शेतकरी गंगाराम जगताप,इंदिरा नगराळे,पतरु नळे,आदी शेतकऱयांनी दिलेली प्रतिक्रिया पाहू या …
[31/05, 4:07 PM] कुंदोजवार संतोष: यासंदर्भात गैरअर्जदार शंकर नळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतले असता या रस्त्याबाबत न्यायालयाचा मनाई हुकूम असून ग्रामस्थ चुकीची माहिती देऊन माझेवर अन्याय करीत असल्याचे सांगितले
परंतु न्यायालयीन वाद दुसऱ्या सर्व्ह मधील रस्त्याबाबत असून साखरवाही ते अहेरी या पांदण रस्त्याबाबत असे कोणतीही माहिती नसल्याचे महसूल अधिकाऱयांनी सांगितले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here