Home क्राइम खाकी वर लागला डाग, ठाणेदारासह 5 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

खाकी वर लागला डाग, ठाणेदारासह 5 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

120
0

Pratikar News

गोंदिया – आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या चोरीच्या प्रकरणात अटकेतील आरोपी 30 वर्षीय राजकुमार अभयकुमार याचा तुरुंगात बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी आमगावच्या ठाणेदारासह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राजकुमार व साथीदारांनी तब्बल दोन वेळा आमगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत संगणक संच व एलसीडी चोरी केली होती, यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 20 मे ला 4 आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यापैकी राजकुमार याला बेदम मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला.
राजकुमारच्या मृत्यूला जबाबदार आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण (४१), सहायक पोलीस निरीक्षक महावीर शिवाजी जाधव (४०), ठाणेदाराचा वाहनचालक पोलीस हवालदार खेमराज मार्कंड खोब्रागडे (५२), पोलीस शिपाई अरुण उईके (३३) व दत्तात्रय कांबळे (३३) यांच्यावर सीआयडीचे पोलीस निरीक्षक विनोद वाकडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२, ३३०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमगाव न्यायाधीशांच्या उपस्थितीत सीआयडीने प्रत्यक्षदर्शी सुरेश राऊत व राजकुमार मरकाम यांचे जबाब नोंदविले. मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here