Home आपला जिल्हा दारूबंदीच्या खेळात आजी-माजी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याची वाट लावली :- राजु झोडे*...

दारूबंदीच्या खेळात आजी-माजी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याची वाट लावली :- राजु झोडे* *भाजपाचे मुनगंटीवार व काँग्रेसचे वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांची जाहीर माफी मागावी*

154
0

*दारूबंदीच्या खेळात आजी-माजी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याची वाट लावली :- राजु झोडे*

*भाजपाचे सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांची जाहीर माफी मागावी*

महाराष्ट्र सरकारने कालच्या मंत्रिमंडळ निर्णयात चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.१ एप्रिल २०१५ पासून सलग सहा वर्ष दारूबंदी जिल्ह्यात होती. या सहा वर्षांच्या काळात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात होत ऊत आला. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी होणाऱ्या परिणामाची कसलीही शहानिशा न करता आपल्या हेकेखोरपणामुळे त्यांनी जिल्ह्यात दारूबंदी केली. दारूबंदीला काँग्रेसच्या नेत्यांनीही कोणत्याही प्रकारचा विरोध दर्शविलेला नव्हता. दारूबंदी लागताच जिल्ह्यामध्ये अवैद्य दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली. यामध्ये काँग्रेस व बीजेपीचे मोठ्या नेत्यापासून तर कार्यकर्ते सामील होते. जिल्ह्यातील बेरोजगारांचा, पर्यटनाचा, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा, जिल्ह्याला मिळणाऱ्या महसुलाचा कसलाही विचार न करता माजी अर्थमंत्र्यांनी दारूबंदी केली. याचे दुष्परिणाम एवढे भयंकर झाले की, बेरोजगार, व्यवसायिक, दारू व्यवसायावर आधारित कामगार यांच्यावर अचानक उपासमारीची पाळी आली होती. त्यातच जिल्ह्यामध्ये विषारी दारू, ड्रग्स, गांजा खुलेआम मिळत असल्याने तरुण वर्गांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढून गुन्हेगारी सुद्धा वाढली. महिला, बालक हेसुद्धा दारूबंदीच्या काळात दारू विकत असल्याने यांच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. सहा वर्षाच्या काळात एवढे मोठे दुष्कर्म दारूबंदीमुळे झाले.याला जबाबदार भाजपाचे सुधीर मुनगंटीवार व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आहेत. या दोन्हीही आजी-माजी पालकमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची जाहीर माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here