Home Breaking News *याला म्हणतात माणुसकी* *⭕गडचांदूरातील लालसरे व जैन परिवाराकडून “एक हात...

*याला म्हणतात माणुसकी* *⭕गडचांदूरातील लालसरे व जैन परिवाराकडून “एक हात मदतीचा”* *🔷ग्रा.रुग्णा.ला 2 लाखांची औषधी व इतर साहित्य भेट*

13
0

Pratikar News

गडचांदूर:- कोरोना रुग्णांची संख्या व आक्सिजन अभावी होणारे मृत्यू लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे.वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येकांनी आपले प्राण गमवले.अशा कठिण समयी विवीध शहरात माणुसकीची जाण असणार्‍या व्यक्तींकडून नानाप्रकारे मदत पुरवली जात असल्याचे चित्र आहे. याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील प्रतिष्ठित व्यवसायी संभाजी लालसरे व आयरा मनीष जैन परिवाराने मानवतेच्या दृष्टीने “एक हात मदतीचा” म्हणून 7 ऑक्सिजन सिलेंडर,1 ऑक्सिजन काँसेंटेटर,10 पल्स ऑक्सिमिटर व इतर औषधी असे अंदाजे 2 लाखांचे साहित्य गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला भेट म्हणून दिल्या आहे.वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत गेडाम यांनी हे सर्व साहित्य स्वीकारत दोन्ही परिवाराचे आभार मानले आहे.
यावेळी पत्रकार प्रा.अशोक डोईफोडे, पत्रकार दिपक खेकारे,नगरसेवक अरविंद मेश्राम, प्रा.श्रीमती आरजू आगलावे, मुख्याध्यापिका मंजूषा लालसरे,पंकज मत्ते, ग्रा.रुग्णा.चे आकाश राठोड,शैलेश ठवरे, मनीषा कनाके,गोविंद गोणारे,अंजली धोंगडे,रमेश राठोड इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
साहित्य देण्यासाठी संभाजी लालसरे, नंदाताई लालसरे, आयरा मनीष जैन,सपना जैन,आरजू आगलावे, पंकज मत्ते, मंजूषा मत्ते, सतीश राजूरकर, ज्योसना राजूरकर,सुरेश राजूरकर, सुलभा राजूरकर,श्रीकांत खाडे,अनुश्री खाडे, गजानन लालसरे यांचे महत्वपूर्ण योगदान असून हे सर्व साहित्य तातडीने गडचांदूर पर्यंत पोहचविण्यासाठी पंकज केशवानी यांनी अथक परिश्रम घेतले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here