अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक अधिकारी ,लोकप्रतिनिधी ,यांच्या घोषणा , कागदा वरचं !कृती शून्य रेती तस्कर मोकाटच आशीर्वाद कोणाचा ,आमदाराचा !महसूल विभागाचा !पोलिसाचा !
चंद्रपूर,दि. 17 मे :अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हयात संभाव्य गौण खनिज चोरी होणाऱ्या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या व्यक्तीवर व वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता – 1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येते.
जिल्हयात रेतीघाटातील अवैध उत्खनन व वाहतूकीबर उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांचे
मार्फत नियंत्रण ठेवण्यात येते. वाळू,रेती निर्गती सुधारीत धोरण, 2019 नुसार अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण
ठेवण्याकरीता उपविभागीय स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधीत तहसिलदार, प्रादेशीक परिवहन
अधिकारी यांचा प्रतिनीधी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत तहसिलदार यांचा समावेश
असलेली समिती गठीत केलेली आहे, तालुका स्तरावर तहसिलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख, गट विकास
अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसिलदार (महसूल) यांचा समावेश असलेली समिती गठीत केलेली आहे.
तसेच ग्राम पातळीवर ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्राम सेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांचा समावेश
असलेली गठीत केलेली आहे.
या ठिकाणी जे लोक नेमले आहेत ते तलाठी मुख्यालयी राहतात काय !गावचा ग्रामसेवक तरी गावात राहतात का! राजुरा विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत किती कारवाया केल्या त्याची माहिती जनते पर्यंत येऊ ध्या ना !
रात्रभर रेती तस्करी होते त्यातील किती पोलिसांना गस्त करीत असताना गाड्या पकडल्या शून्य !
राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास निधी चां वाटप केला ते सर्व बांधकाम चोरीच्या रेतीचे करीत आहेत म्हणजे येथील आमदाराचा रेती तस्करांना पाठींबा आहे का!
आमदार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट करावी ,जर पाठींबा नसेल तर चोरटी वाहतूक होतेच कशी !राजुरा शहरात रोज 100 ब्रास रेती येत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे !
शहरात दुकानदार थोडी जरी दुकाने उघडली तर सिल करून कारवाई होते .मग रेती तस्कर तुमचे नातलग आहेत का!दुकानदाराच्या नाराजीचे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे.
दुकानदार मालक असताना तो चोरासारखे मागच्या दाराने सामान देण्याची पाळी! लाखो रुपये लाऊन दुकान लावणाऱ्या वर पाळी आली आहे.