Home विशेष जुन्नर तालुक्यात घडला आदर्श विवाह….!!* *वंचित बहुजन आघाडी व मंगल परिणय...

जुन्नर तालुक्यात घडला आदर्श विवाह….!!* *वंचित बहुजन आघाडी व मंगल परिणय गृप पुणे व्हॉट्स अप गृपच्या* माध्यमातून जुळला विवाह….

103
0

*जुन्नर तालुक्यात घडला आदर्श विवाह….!!*

*वंचित बहुजन आघाडी व मंगल परिणय गृप पुणे व्हॉट्स अप गृपच्या* माध्यमातून जुळला विवाह….

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला विवाह सोहळा….!!

अनिष्ट रुढी,परंपरांना बगल देत नवा आदर्श घडविला….!!

तेजेवाडीः जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी या गावात दि.२४ मे २०२१ रोजी आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला…..!!
मुलगा मेकॕनिकल इंजिनियर….मुलगी नर्सिंग डिप्लोमा झालेली….नारायणगाव येथील अविनाश मनोज कांबळे हा इंजिनियर…तर तेजेवाडी येथील अर्चना नामदेव उघडे या दोघांचा विवाह अत्यंत साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला….ना कुठला गाजावाजा….ना कुठला मानपान….ना हुंडा….ना देणे-घेणे……अशा परिस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला….. !! सविस्तर वृत्त असे कि,प्रा.किशोर चौरे यांनी काही दिवसांपुर्वी बौद्ध समाजातील युवक-युवतींसाठी विवाह जमविण्यासाठी *मंगल परिणय गृप पुणे* हा व्हॉट्स अप गृप सुरु केला होता.या गृपमध्ये बौद्ध समाजातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,वैद्यकीय,सहकारी,सरकारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी गृपमध्ये आहेत.याच गृपमध्ये असणारे वंचित बहुजन आघाडी चे पुणे जिल्हा सहसचिव गणेश ज.वाव्हळ यांच्यामार्फत त्यांचा आत्तेभाऊ अविनाश मनोज कांबळे,इंजिनियर तसेच याच गृपमध्ये असणाऱ्या वंचित बहुजन महिला आघाडी च्या जुन्नर तालुका अध्यक्ष निलमजी खरात यांच्यामार्फत त्यांची बहिण अर्चना नामदेव उघडे यांचा बायोडाटा गृपमध्ये पाठवण्यात आला होता.मुलगा मुलगी दोन्ही जुन्नर तालुक्यातील युवक,युवती असल्याने मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला,मुलगा मुलगी यांची पसंती झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यात विवाह सोहळा संपन्न करण्याचा निर्णय दोन्हीही बाजुच्या मंडळींनी घेतला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत,तसेच कोणताही वायफळ खर्च न करता,तसेच हुंडा देणे-घेणे,तसेच अनिष्ट प्रथा,मानपानाचा अवास्तव खर्च,लग्नपत्रिका,वरात,हॉल,ई अनावश्यक खर्च न करता विवाह नवरीमुलीच्या दारामध्ये अगदी घरातील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा संपन्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.आणि लगेचच एकाच आठवडाभराच्या अंतराने म्हणजेच दि.२४ मे २०२१ रोजी सकाळी ११.०० वा विवाह अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला.मंगल परिणय विधी बौद्धाचार्य पुनम दुधवडे(महासचिव,वंचित बहुजन आघाडी,जुन्नर तालुका) यांनी हा विवाह सोहळा मोफत लावला.हा विवाह सोहळा पार पाडण्याकरीता *मंगल परिणय गृप पुणे* चे ॲडमिन प्रा.किशोर चौरे सर,वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सहसचिव गणेश ज.वाव्हळ,वंचित बहुजन महिला आघाडी जुन्नर तालुका अध्यक्षा निलम खरात यांनी विशेष प्रयत्न केले.जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे.
.

संकलन
गणेश जनार्दन वाव्हळ
सहसचिव,वंचित बहुजन आघाडी,पुणे जिल्हा.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here