Home राष्ट्रीय 26 मे ला आयटक पाळणार काळा दिवस * केंद्र सरकारच्या कामगार...

26 मे ला आयटक पाळणार काळा दिवस * केंद्र सरकारच्या कामगार – किसान विरोधी नीतीचा विरोध

70
0

* 26 मे ला आयटक पाळणार काळा दिवस
* केंद्र सरकारच्या कामगार – किसान विरोधी नीतीचा विरोध
राजुरा, तालुका प्रतिनिधी –
केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी, जनता यांच्या विरोधी निती राबवित असलेल्या धोरणाचे विरोधात निषेध नोंदविण्यासाठी तसेच सार्वजनिक उद्योगातील कामगारांच्या कायद्याचे रूपांतर चार कोड मध्ये करून कामगारांवरील अन्यायकारक कायदे रद्द करावे आणि शेतकरी विरोधी काळे कायदे परत घ्यावे, या मागणीसाठी संयुक्त खदान मजदूर संघाने बल्लारपूर क्षेत्रात दिनांक 26 मे ला काळा दिवस पाळण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. बल्लारपूर क्षेत्रातील आयटक संघटनेचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या विरोधात आपला निषेध नोंदवणार आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने उद्योगपती धार्जिणे कायदे करून कामगार कायद्याचे केवळ चार कोड मध्ये रूपांतर केले आहे. हा सार्वजनिक उद्योगात कार्यरत कामगारांवर मोठा अन्याय आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर तीन कृषी कायदे लादून मोठा अन्याय केला आहे. केंद्र सरकार जनविरोधी नीती राबवित असून याचा निषेध करण्यासाठी 26 मे ला बल्लारपूर क्षेत्रातील सर्व सातही कोळसा खाणीत काळ्या फिती लावून निषेध नोंदविला जाणार असल्याची माहिती संयुक्त खदान मजदूर संघाने दिली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here