Home आपला जिल्हा चंद्रपूर मनपाद्वारे बाबूपेठ, आंबेडकर प्रभागात मान्सूनपूर्व नाले सफाई*

चंद्रपूर मनपाद्वारे बाबूपेठ, आंबेडकर प्रभागात मान्सूनपूर्व नाले सफाई*

54
0

*मनपाद्वारे बाबूपेठ, आंबेडकर प्रभागात मान्सूनपूर्व नाले सफाई*

*चंद्रपूर, ता. २४ :* चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे केले जात आहेत. सोमवारी (ता. २४) झोन 3 (ब) अंतर्गत बाबूपेठ प्रभाग १३, आंबेडकर प्रभाग क्र. १७ मध्ये नाले सफाई करण्यात आली.

महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान सुरू आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा पावसाळा सुरु होण्याआधीच मनपाद्वारे मागील महिनाभरापासून शहरात नाले स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सोमवारी झोन ३ (ब) अंतर्गत नाले सफाई काम आंबेडकर प्रभाग क्र. १७ मध्ये सिद्धार्थनगर ओपन स्पेस ते गुडेकर यांच्या घरापर्यंत मनुष्यबळांच्या माध्यमातून सफाई करण्यात आली. बाबूपेठ प्रभाग १३मध्ये कॅन्टीन चौक ते एमइसीबी ऑफिसपर्यन्त सफाई करण्यात आली. उडिया वस्ती सावरकर नगर व कॅन्टीन चौक येथे जेसीबीच्या माध्यमातून सफाई करण्यात आली.

नाले स्वच्छता अभियानाअंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येत आहे. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here