Home आपला जिल्हा वाघाचे हल्यात एकाचा मृत्य,,आंबे तोडणे जीवावर बेतले,,, मूल तालुक्यातील मारोडा शिवारातील घटना,सततच्या...

वाघाचे हल्यात एकाचा मृत्य,,आंबे तोडणे जीवावर बेतले,,, मूल तालुक्यातील मारोडा शिवारातील घटना,सततच्या वाघाच्या हल्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढला

219
0

वाघाचे हल्यात एकाचा मृत्य,,आंबे तोडणे जीवावर बेतले,,,
मूल तालुक्यातील मारोडा शिवारातील घटना,सततच्या वाघाच्या हल्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढला
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडण्यास गेलेल्या मारोडा येथील मनोहर आडकुजी प्रधाने याला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी मूल तालुक्यातील मारोडा शिवारात घडली .
तालुक्यातील मारोडा येथील आदर्श खेड्यात राहणारा मनोहर आडकुजी प्रधाने ( ६८ ) हा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मुलगा आणि सुनेला जेवनाचा डब्बा देवुन नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडुन घराकडे परत येत असतांना नहरात दबा धरून असलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना घडली . सकाळी गेलेला मनोहर दुपारी १२ वाजेपर्यत पर्यत घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता मनोहर प्रधाने नहराच्या काठावर मृतावस्थेत दिसला . मृतक मनोहरचा पाय तोडलेला आणि गळा चिरलेला दिसल्याने वाघानेच त्याला ठार केल्याचे निष्पन्न झाले . घटनेची माहीती होताच वनपरीक्षेत्र अधिकारी जी.आर.नायगमकर , क्षेत्र सहाय्यक पाकेवार , वनरक्षक उईके , पारधे आणि ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली . मृतक मनोहर प्रधाने यांच्या कुटुंबीयास वनविभागाने २५ हजार रूपयाची तातडीची मदत दिली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here