Home क्राइम अवैधरित्या सागवान लाकडासह आरोपीस अटक,,,राजुरा वन कर्मचार्याची कारवाई

अवैधरित्या सागवान लाकडासह आरोपीस अटक,,,राजुरा वन कर्मचार्याची कारवाई

271
0

अवैधरित्या सागवान लाकडासह आरोपीस अटक,,,राजुरा वन कर्मचार्याची कारवाई

राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-

गुप्त माहिती मिळाल्यावरून वन राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कर्मचाऱयांना घेईन सुमठाणा गावातील दौलत सुरतेकर याचे घरी धाड टाकून बेकायदेशीर आणलेले 8 हजार 89 रुपये किमतीचे सागवान प्रजातीचे सागवान लाकडे व इतर अवजारे जप्त करण्यात आले ग्या प्रकरणात दौलत सुरतेकर यास अटक करून वन गुन्हा दाखल करण्यात आला असून यात इतर कुणीही आरोपी सहभागी आहेत का किव्हा यापेक्षा किती झाडाची,कुठल्या वनक्षेत्रातून झाडे तोडण्यात आले याची चौकशी करण्यात येत आहे
मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सुमठाणा नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक 154 मध्ये सागवान झाडाची अवैध तोड झाल्याचे समजताच वन कर्मचारी त्या चौकशीचे मार्गावर होते दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांना गुप्त माहिती मिळताच अधिनस्त वन कर्मचारी क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,वनरक्षक मीरा राठोड,मनोज वानखेडे,,संजय चौबे,वनमजुर,शामराव खेडेकर,प्रभूदास धोटे यांनी सुमठाणा येथील दौलत सुरतेकर याचे घरी धाड टाकून झडती घेतली असता बेकायदेशीर रित्या सागवान झाडाचे लाकूड आढळून आले मोका पंचनामा करून सुमारे 8 हजार 89 रुपयांचे सागवान आणि साहित्य जप्त केले व आरोपीस वन कर्मचाऱयांनी अटक करून वनगुन्हा दाखल करून पुढील तपास उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here