Home Breaking News 1 जून ला ईपीएस-95 पेंशनधारकांचे देशव्यापी उपवास आंदोलन 67 लाख पेंशनधारकांचा...

1 जून ला ईपीएस-95 पेंशनधारकांचे देशव्यापी उपवास आंदोलन 67 लाख पेंशनधारकांचा सहभाग

179
0

1 जून ला ईपीएस-95 पेंशनधारकांचे देशव्यापी उपवास आंदोलन

67 लाख पेंशनधारकांचा सहभाग

राजुरा – देशातील ईपीएस -95 पेंशन धारकांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता मागील अनेक वर्षापासून राष्ट्रीय संघर्ष समिती च्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून येत्या 1 जून रोजी ईपीएस -95 पेंशन धारकांनी देशव्यापी उपवास आंदोलन पुकारले असून यात 67 लाख ईपीएस-95 पेंशन धारक आप आपल्या घरुनच सहभागी होणार असल्याची माहीती राष्ट्रीय संघर्ष समिती शाखा चंद्रपूर चे अध्यक्ष अध्यक्ष परशुराम तुंडूलवार उपाध्यक्ष रामचंद्र मुसळे सचिव दयाशंकर सिंग यांनी दिली आहे.

देशातील विविध महामंडळ, खाजगी उद्योग, सहकार क्षेत्रात काम केलेल्या सुमारे 67 लाख ईपीएस-95 पेंशनधारक हे गेल्या अनेक वर्षापासून न्यायाच्या अपेक्षेत आहेत या पेंशन धारकांना केवळ 300 ते 3 हजार रूपयापर्यंत पेंशन मिळते. त्यावर कुठलाही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही. कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वात या पेंशनधारकांनी आज पर्यंत राष्ट्रीय संघर्ष समिती च्या माध्यमातून सर्व प्रकारची आंदोलने केली. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील 4 मार्च 2020 रोजी दिल्ली येथे खासदार हेमा मालीनी यांचे समवेत भेट घेऊन चर्चा करूण निवेदन दिले. पंतप्रधानांनी समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पेंशनधारकांचा प्रश्न निकाली लागणार अशी आशा निर्माण झाली होती. केंद्रीय श्रम मंत्री यांचे सुचनेवरून संघटनेने सर्व आंदोलन स्थगीत केली. मात्र संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथे पेंशनधारकांचे साखळी उपोषण सुरू ठेवलेले आहे व गेल्या 880 दिवसापासून हे आंदोलन बुलढाणा येथे सुरू आहे. मात्र आजपर्यंत या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतल्या गेली नाही व पर्यायाने कोरोनाच्या या कठीण काळात अनेक पेंशनधाकर सन्मानजनक पेंशनची वाट पाहत हे जग सुद्धा सोडून गेले आहे.

कोरोना साथीचा रोग गेल्या वर्षीपासून आला होता परंतू या पेंशनधारकांसाठी गेल्या अनेक वर्षापासून ईपीएस पेंशनची महामारी सुरू झाली आहे. ज्यात जवळपास 5 हजार ईपीएस पेंशनधाकर जगातून निधून गेले आहेत. आणि आता कोरोणा महामारीमुळे मृत्यूचे प्रमाण आणखीनच वाढले आहे.

सरकारचे लक्ष वेधण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून 1 जून रोजी ईपीएस 95 पेंशनधारकांनी एक दिवसीय राष्ट्रव्यापी उपोषण कार्यक्रम हाती घेतला आहे. या दिवशी देशातील 67 लाख पेंशनधारक आप आपल्या घरी आपल्या कुटूंबीयांसोबत सकाळी 8 ते सार्यकाळी 5 वाजेपर्यंत उपवास करतील व त्यानंतर या उपवास आंदोलनाचा आपला फोटो त्यांचे त्यांचे लोकसभा मतदार संघातील खासदार तसेच पंतप्रधान यांना ईमेल, व्हॉट्सॲप, ट्विटरवरून पाठवतील व आपल्या भावना व्यक्त करूण न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करतील. या आंदोलनात सध्या कार्यरत असलेल्या कामगारांनी सुद्धा त्यांचे उज्वल भविष्यासाठी भाग घ्यावा. जे वृद्ध आजारी पेंशनधारक असतील त्यांनी उपवास न करता प्रार्थना करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

ईपीएस पेंशन धारक व कार्यरत कर्मचारी यांनी हे उपोषण आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन ईपीएस-95 राष्ट्रीय संघर्ष समिती शाखा चंद्रपूर चे अध्यक्ष परशुराम तुंडूलवार उपाध्यक्ष रामचंद्र मुसळे सचिव दयाशंकर सिंग यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here