Home Covid- 19 जिल्हा परिषद चंद्रपूर व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रांना 63आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण* ...

जिल्हा परिषद चंद्रपूर व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रांना 63आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण* *”डाॅक्टरांचे कार्य हे देवा सारखे- संध्याताई गुरनुले*

44
0

*जिल्हा परिषद चंद्रपूर व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रांना 63आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण*

*”डाॅक्टरांचे कार्य हे देवा सारखे- संध्याताई गुरनुले*

चंद्रपूर दि. 22 मे : जिल्हा परिषद,चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधक सर्व दक्षता पाळून घेतलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांना आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, उपाध्यक्ष तथा ,आरोग्य समिती सभापती रेखाताई कारेकार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोशनी खान, जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.प्रकाश साठे उपस्थित होते.

कोरोना विषाणू आजाराचे नियंत्रणाकरिता जिल्हा परिषद,चंद्रपूरचा सुरवातीपासूनच सहभाग राहिलेला आहे. या अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे पुढाकाराने पंचायत विभागामार्फत पंधरावे वित्त आयोगाचे ५८ लक्ष अनुदान उपलब्ध करून देण्यात आले.यामधून ग्रामिण भागातील जनतेस आकस्मिक परिस्थितीत आॅक्सीजन सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांची खरेदी करण्यात आली. या उपकरणांचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मागील वर्षी पासून कोविड नियंत्रणाकरिता अहोरात्र झटणारे डाॅक्टर्स,आरोग्य कर्मचारी हे देवा सारखेच आहेत असे भावपूर्ण उदगार त्यांनी काढले.यावेळी चंद्रपूर तालुक्याच्या तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.माधुरी मेश्राम, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापुर चे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमित जयस्वाल, प्राथमिक आरोग्य केंद्र चिचपल्ली च्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रध्दा माटुरवार यांनी साहित्य स्विकारले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.राजकुमार गहलोत यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे संचलन सेवानिवृत्त जिल्हा आयुष अधिकारी डाॅ.गजानन राऊत यांनी केले.कार्यक्रमाकरिता प्रशासन अधिकारी शालिक माऊलीकर,जिल्हा औषधनिर्माण अधिकारी किशोर नेताम,
साथरोग वैद्यकिय अधिकारी डाॅ.मिना मडावी,आरोग्य पर्यवेक्षक अब्दुल वहाब कुरेशी व सुभाष सोरते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here