Home विशेष मोहता मिल यांना मिल लॉकडाउन करण्याची परवानगी देऊ नये – माजी आमदार...

मोहता मिल यांना मिल लॉकडाउन करण्याची परवानगी देऊ नये – माजी आमदार प्रा.राजू तिमांड -माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना केली मागणी

44
0

🔸माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना केली मागणी

✒️(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.22मे):-आर.एस.आर मोहता इंडस्ट्रीज लिमिटेड स्पिनिंग अँड विव्हिंग मिल हिंगणघाट यांना मिल लॉकडाऊन करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे केली आहे.मोहता इंडस्ट्रीज लिमिटेड हिंगणघाट जि वर्धा यांनी 17 मे 2021 रोजी महाराष्ट्र ट्रेड युनियन आणि प्रोव्हीबिशन लेबर ॲक्ट 5-1971 नुसार सब सेक्शन(2) सेक्शन 24 नुसार स्पिनिंग अँड विव्हिंग डिपार्टमेंट लॉकडाउन करण्याचे बिना सहीचे नोटीस पाठविले आहे व प्रवेशद्वारावर लावले आहे. त्यांचा कालावधी 1 जून 2021 पासून राहिल असे नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दोन टप्प्यात लॉकडाऊन असल्यामुळे 1 जुन 2021 पर्यंत मोहता मिल इंडस्ट्रीने जाणून-बुजून कंपनी बंद ठेवली. या कालावधीत जिल्ह्यातील कार्यरत उद्योगाला या आदेशानुसार सूट देण्यात आली होती. परंतु या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून मोहता इंडस्ट्रीने जाणून बुजून लॉकडाउनच्या कालखंडात उद्योग बंद ठेवुन 650 कामगारांचे आर्थिक नुकसान केले आहे.मोहता इंडस्ट्री हिंगणघाटला 125 वर्षाची जुनी परंपरा असून या ग्रुपने या कंपनीच्या भरोशावर एक्सपोर्ट कॉलिटीच्या इंडस्ट्रीज परिसरात उभ्या केल्या आहे.मोहता इंडस्ट्रीने 2017 मध्ये कपडा खाता बंद करून कामगारांना व्ही.आर.एस दिला नाही त्यासंबंधाने नागपूर हायकोर्ट केस चालू आहे तसेच या कामगारांना न्याय देण्यासंबंधी दोन मीटिंग कामगार मंत्रालयात पार पडल्या.

अजूनही त्यावर निर्णय झाला नाही.मागील दोन वर्षापासून प्रोसेसिंग आणि फोल्डिंग खात्यात इल्लीगल लेआॅफ सुरू असून कामगारांना अर्धा पगार सुरू आहे कंपनीच्या अडेलतट्टू धोरणानुसार कामगारांच्या लेआॅफची केस कोर्टात सुरू आहे. मागील 02 वर्षापासून कामगारांना अर्धा पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही. अशी गंभीर परिस्थिती कामगारांवर आली असून उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे कामगारांच्या परिवाराचे भविष्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.तरी हिंगणघाट येथील कामगार नगरीचे हीच लक्षात घेता मोहता इंडस्ट्रीला सरकारने ‘मिल लॉकडाउन’ करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here