Home विशेष एक्स बॉयफ्रेंड ला धडा शिकवण्यासाठी तिने रचले लग्नाचे नाटक- ...

एक्स बॉयफ्रेंड ला धडा शिकवण्यासाठी तिने रचले लग्नाचे नाटक- ब्रेकअपनंतर तिनं खोट लग्न केलं. केवळ हे लग्न एक नाटक आहे असं तिने सांगितलं

38
0

Pratikar News

   दगाबाज बॉयफ्रेंड ला धडा शिकवण्यासाठी  गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलासोबत लग्नाचे किंवा प्रेमाचे नाटक करते हे फक्त चित्रपटातच दाखवले जाते असे नाही. तर रियल लाईफ मध्ये सुद्धा असे प्रसंग घडतात. जर्मनीतील सारा नामक युवतीने आपल्या एक्स बॉयफ्रेंड ला धडा शिकवण्यासाठी असे काही केले की तुम्हालाही वाटेल की खरचं असं होऊ शकते का ?

                                       जगभरातील सर्वात लोकप्रिय अॅपमधील एक अॅप टिकटॉक होते. टिकटॉकवर अनेक लोक तसेच कलाकार नवनवीन कला सादर करताना दिसायचे. केवळ मनोरंजनच नाही तर काही प्रेरणादायी संदेश, अनुभव सुद्धा शेअर केले जात असे. तसेच टिकटॉकवरचे अनेक व्हिडीओ अजूनही सतत व्हायरल होत असतात.

सध्या टिकटॉकवर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका मुलीने ब्रेकअपनंतर आपल्या बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी नेमकं काय आणि कसं केलं? या गोष्टींचा खुलासा केला आहे. ही मुलगी एक प्रसिद्ध टिकटॉकर असून तिने ब्रेकअप झाल्याचा तीन महिन्यानंतर चक्क लग्नाचं नाटक केलं.सारा विलार्ड असं या तरुणीच नाव आहे सारा ही जर्मनीतील असून टिकटॉकवर अत्यंत लोकप्रिय आहे. 24 वर्षीय सारा ही कॉलेज विद्यार्थीनी आहे.

ब्रेकअपनंतर तिनं खोट लग्न केलं. केवळ हे लग्न एक नाटक आहे असं तिने सांगितलं. ब्रेकअप झाल्याच्या तीन महिन्यानंतर तिने हे नाटक केलं आहे. आपल्या बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी साराने हे लग्न झाल्याचं भासवलं आहे.

हे लग्न खरच झालंय याची खात्री बॉयफ्रेंडला पटण्यासाठी तिने लग्नासाठी वेडिंग ड्रेस विकत घेतला. वेडिंग ड्रेस घेऊनही तिचं भागलं नाही, तर साराने नवरा म्हणून एक मुलगा देखील भाड्याने घेतला आणि त्याला तिचा नवरा असल्याच दाखवलं. त्यानंतर तिने आणि नकली नवऱ्याने लग्नाचे फोटोशूटही केले.

लग्नाचे कपडे, भाड्याने आणलेला नकली नवरा आणि या सगळ्यासोबत केलेलं फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. खोट लग्न भासवण्यासाठी तिने चांगलीच तयारी केली होती. या खोट्या लग्नासाठी बराच खर्च केला असून अद्याप किती पैसे खर्च केले ते सांगितलं नाही.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तिने एक्स बॉयफ्रेंडचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे सगळा खटाटोप केला होता, तसेच केलेला खटाटोप कामी आल्याचं सुद्धा तिने सांगितल आहे. शेअर केलेले फोटो बघून एक्सबॉयफ्रेंडने इंन्टाग्रामवर मला शोधलं आणि लगेच दुसऱ्या दिवसी मला मेसेजही केला, असं सारा विलार्ड म्हणाली.

सारा विलार्ड म्हणाली, आम्ही एकत्र असताना मी त्याला फसवत आहे, असं त्याला वाटलं. परंतु मी त्याची फसवणुक केली नव्हती. फोटोशूटच्या या संपूर्ण प्रकरणानंतर तो माझ्या घरी आला, त्याला माझ्यासोबत बोलायच होतं. पण आता मला त्याच्यासोबत बोलण्यात काहीही रस नाही. बदला घेण्यासाठी मी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहे.

दरम्यान, साराने फोटोशूटचे सगळे फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत. तसंच तिच्या एक्सबॉयफ्रेंडला सोशल साईट्स वरून ब्लॉकही केल्याचं तिनं सांगितलं. मागील आठवड्यामध्ये तिने हा अनुभव शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here