Home कृषी सोनापूर येथील माजी मालगुजारी तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन* *शेतीसाठी होणार पाण्याची...

सोनापूर येथील माजी मालगुजारी तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन* *शेतीसाठी होणार पाण्याची सोय शेतकऱ्यांना मोठा दिलासा*

104
0

*सोनापूर येथील माजी मालगुजारी तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन*

*शेतीसाठी होणार पाण्याची सोय शेतकऱ्यांना मोठा दिलासा*

सुखसागर झाडे चामोर्शी:- टाटा ट्रस्ट व बि.पि.सि.एल च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प सुरू असून या अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील ग्राम पंचायत सोनापूर येथील मामा तलाव सर्वे नं. ३००/३०१ चे गाळ काढण्याच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले. टाटा ट्रस्ट ने जलसंवर्धनाचे काम हाती घेऊन त्याअंतर्गत तलावाचे पुनर्जीवन करणे सुरू आहे, त्यानुसार सोनापूर मामा तलावाचे खोलीकरण करून तलावातील पाणी साठवणूक क्षमता वाढ होणार आणि तलाव खालील निस्तारहक्क क्षेत्रातील शेतकऱ्यांना नवी संजीवनी मिळणार आहे. सोनापूर ग्राम पंचायत प्रशासनाने मृद व जलसंधारण संवर्धन करण्यासाठी एक प्रयत्न करून गावात टाटा ट्रस्ट च्या पुढाकाराने तलावाखालील निस्तार हक्क धारक शेतकऱ्यांचा जय किसान शेतकरी पाणी वाटप गट निर्माण करून याद्वारे तलावाची देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे. सौ. गॊपिका गुरूदास टेकाम सरपंच ग्रा.प.सोनापुर यांचे हस्ते तलावाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच श्री शेषराव कोहळे, उषाताई चलाख सदस्या, कल्पनाताई सिडाम सदस्या, एकनाथजी सातपुते, प्रदिप दुधबावरे, महेश आभारे प्रोग्राम असोसिएट – सोशल मोबिलायझेशन टाटा ट्रस्ट, रघुनाथजी मडावी, विठ्ठल कुंनघाडकर, अंकित दुधबावरे, गुरुदास टेकाम उपस्थित होते. गावकरी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला ग्रामपंचायत प्रशासनाने श्री.पवन राऊत कंस्ट्रक्शन टाटा ट्रस्ट वर्धा चे आभार मानले।।

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here