Home Covid- 19 गडचांडुर येथील डॉ.सचिन भसारकर सरांची अखेर कोरोनाविरुध्दची झुंज अयशस्वी.

गडचांडुर येथील डॉ.सचिन भसारकर सरांची अखेर कोरोनाविरुध्दची झुंज अयशस्वी.

136
0

अखेर डॉ.सचिन भसारकर सरांची कोरोनाविरुध्दची झुंज अयशस्वी…!
माझे मित्र जिजामाता महाविद्यालयातील भूगोल विषयाचे प्रा.डॉ.सचिन भसारकर यांचे दि.२०/५/२१ रोजी सायंकाळी निधन झाले.ते ३७ वर्षाचे होते.कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना नंदुरबार येथील स्मित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.पण श्वसनाचा त्रास अधिक होत असल्यामुळे त्यांना सुरत येथील युनीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.दरम्यान काल सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली
त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी मनिषा, दोन मुली गार्गी(३वर्ष),युवा (१वर्ष), दोन भाऊ,असा परिवार आहे…..
सरांचे शिक्षण त्यांचें मूळ गाव गडचांदूर जि.चंद्रपूर येथेच झाले होते.पदव्युतर शिक्षण घेतल्यानंतर सरांनी मेडीकल व्यवसायात मोठी प्रगत केली होती.पण,’सचिन, तुम्ही मेडीकल व्यवसायात तुम्ही पैसे भरपूर मिळवाल.मात्र त्या पैशातून समाधान मिळणार नाही.. म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्रात करिअर करावे.’.अशी होणार्या पत्नीनी ईच्छा व्यक्त केली… आणि मग काय पत्नीच्या समाधासाठी सरांनी प्रचंड मेहनतीने अभ्यास केला.प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली नेट,सेट ही परीक्षा दोन बर्षात चार वेळा उत्तीर्ण केली.पी.एच.डी.पदवी संपादन केली.. जिजामाता कॉलेज ला नोकरी मिळाल्यानंतर सचिन-मनिषाच्या सहजीवन वेलीवर दोन सुगंधी कळया उमवलल्या.आता कुठे सुखाचे,समाधानाचे दिवस सुरू झाले होते… मार्चमध्ये तर सरांनी गार्गीच्या शाळेची फिस भरुन शाळा प्रवेश निश्चित केला होता….
अवघ्या ३७ वर्षाचे वय, तरुण, पण संयमी,अभ्यासू, प्रामाणिक, मितभाषी स्वभावाचे असलेले सचिन सर, महाविद्यालयातील सर्वच सहकारी, मित्रांशी आपूलकीने प्रेमाणे वागत असत.गेल्या चार पाच वर्षांत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी स्वतःची त्यांनी ओळख निर्माण केली.अशा या दिलदार, प्रामाणिक आणि मनमिळावू मित्राला अचानक श्रध्दांजली वाहण्याची वेळ यावी ही अत्यंत दुःखदायक घटना आहे….मनिषाताई आणि संपूर्ण भसारकर परिवार व आप्तेष्टांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. हीच तथागत चरणी सदिच्छा….!
… सरांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली..!💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

संकलन

श्रीकृष्ण गोरे ,सर

राजुरा …

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here