Home क्राइम नक्षल – पोलीस चकमकीत 13 हून अधिक नक्षलवादी ठार* ...

नक्षल – पोलीस चकमकीत 13 हून अधिक नक्षलवादी ठार* *कसनसुर दलमचा खात्मा ; गडचिरोली पोलिस दलाची कामगीरी*

134
0

*नक्षल – पोलीस चकमकीत 13 हून अधिक नक्षलवादी ठार*

*कसनसुर दलमचा खात्मा ; गडचिरोली पोलिस दलाची कामगीरी*

सुखसागर झाडे-: गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रातंर्गत पयडी जंगल परीसरात आज सकाळी सी 60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीसांनी यश मिळविले आहे. या चकमकीत संपूर्ण कसनसुर दलम मारल्या गेल्याची माहिती पूढे येत आहे. प्राप्त माहितीनुसार 10 पेक्षा अधिक मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून शोध मोहिम सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच मेलेल्या नक्षल्याची नेमकी संख्या माहिती होईल. एवढ्यामोठया नक्षली मारल्या जाण्याची एसपी अंकित गोयल यांच्या कार्यकाळातील पहिली तर गडचिरोली जिल्ह्यातील दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी एका चकमकीत 40 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीसांनी यश मिळविले होते.

गडचिरोली पोलीसांचे विशेष अभियान पथक अर्थात सी-60 जवानांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगल परीसरात तेंदूपत्ता हंगामासंदर्भात नक्षलवाद्यांनी बैठक आयोजित केली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या
मार्गदर्शनात शोधमोहीम राबविल्या गेली. यादरम्यान जंगलात बैठकीसाठी एकत्रित झालेल्या नक्षल्यांनी पोलीसांच्या शोध मोहीमेचा सुगावा लागताच, पोलीस पथकावर अंधाधुंद गोळीबार केला. प्रत्यूत्तारादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले गेले. प्राप्त माहीतीनुसार मारल्या गेलेले सर्व नक्षलवादी हे कसनसुर दलमचे असून संपूर्ण दलमच या चकमकीत समाप्त झाले असल्याचे समजते.
पोलीसांनी जंगल परीसरात शोधमोहीम तीव्र केली असून मृत नक्षल्यांचे मृतदेह एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील हे गडचिरोली करीता रवाना झाले असून स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here