Home Breaking News धक्कादायक:नागपूरच्या रुग्णालयात कोरोना रुग्ण मेल्यावर चोरी जायचे त्यांच्या अंगावरील दागिने आणि महागड्या...

धक्कादायक:नागपूरच्या रुग्णालयात कोरोना रुग्ण मेल्यावर चोरी जायचे त्यांच्या अंगावरील दागिने आणि महागड्या वस्तू

46
0

Pratikar News

 Nilesh Nagrale

Nagpur 

नागपूर : नागपुरात कोरोनाच्या कठीण काळात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या अंगावरी मौल्यवान दागिने आणि सामानाची चोरी होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. हे चोरी करणारे दुसरे तिसरे कोणीच नाही तर तिथंलेच वॉर्ड बॉय होते. उपचारादरम्यान रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करताना मृतकाच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करत होते. रुग्णांच्या अंगावरील दागिने, मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू चोरायचे. गणेश डेकाटे आणि छत्रपाल सोनकुसरे असे या दोघांचे नाव असून ते स्पीक अॅण्ड स्पॅन या खाजगी कंपनीकडून मेयो रुग्णालयात वार्डबॉय म्हणून कार्यरत होते.
या कंपनीला मेयो रुग्णालयातील स्वच्छतेसह कोरोना बाधितांच्या मृतदेहांना रॅप करण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यांच्यावर बाधितांचे मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नुकतंच मेयो रुग्णालयात एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खिशातील महागडा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी तहसील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती.
पोलिसांनी त्यासंदर्भात सखोल तपास केल्यावर मृताच्या अंगावरून महागड्या वस्तू लंपास करणारे दुसरे कोणी नाही तर रुग्णालयातील दोघे वार्डबॉय असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक करत विचारपूस केल्यावर दोघांनी आतापर्यंत अशाच पद्धतीने 5 चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी महागडे मोबाईल, घड्याळ, काही रोख रक्कम यांच्यासह कोरोना बाधितांचे काही इंजेक्शन, औषध आणि पीपीई किट असा एकूण 1 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आपण कोरोना वॉर्डात सेवा देत आहोत, लोकं आपल्याला कोविड योद्धा मानतात, त्यामुळे कोणीही आपल्यावर चोरी संदर्भात शंका घेणार नाही, असा त्यांचा समज होता.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here